Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उपजिल्हा रुग्णालयात "आयुष्यमान भवः" साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते  निक्षय मित्र व  टीबी चॅम्पियन रुग्णांचा सन्मान आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १६ सप्टे...
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते निक्षय मित्र व टीबी चॅम्पियन रुग्णांचा सन्मान
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १६ सप्टेंबर २०२३) -
        स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भवः अंतर्गत साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.एम. डाखोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ((Nikshay Mitra and TB Champion patients honored by former Mayor Arun Dhote))

        ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा शुभारंभ झाला असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होवून आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ''आयुष्मान भव'' हा कार्यक्रम ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत आयुष्यमान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान शिबिर, अवयवदान जागृती मोहीम, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम उपकेंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत नियोजन करून लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात येणार आहेत. या सेवांचा लाभ तालुक्यातील लोकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

        आयुष्यमान भवः कार्यक्रमाअंतर्गत समृध्दी नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव मसुर अहमद, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार यांचा निक्षय मित्र म्हणून तर (TB) क्षयरोगावर मात करणाऱ्या रुग्णांचा टीबी चॅम्पियन म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे (arun dhote) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे संचालन नागरे ब्रदर, टीबी कार्यक्रमाचे व्यवस्थापन उमेश डहाळे, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, संजय मंथनवार व औषधोपचार पर्यवेक्षक यांनी केले. (rajura) (aamcha vidarbha)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top