Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिम ट्रेनरसह विद्यार्थिनींनी भार उत्तलन स्पर्धेत मिळविले यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शालिनी बोंथला दोन स्वर्ण पदक, शंकर लक्ष्मण मोहुर्ले एक कांस्य पदक तथा ममता गायकी हीने जिल्हास्तरीय रजत व राज्य स्तरीय कास्य पदक पटकविले माजी...

शालिनी बोंथला दोन स्वर्ण पदक, शंकर लक्ष्मण मोहुर्ले एक कांस्य पदक तथा ममता गायकी हीने जिल्हास्तरीय रजत व राज्य स्तरीय कास्य पदक पटकविले
माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी केले सन्मानित
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. १ सप्टेंबर २०२३) -
        राजुरा निर्वाचण क्षेत्रातील राजुरा शहरात नाव लौकिक असलेल्या स्काँट जिम च्या ट्रेनरसह सह विद्यार्थिनींनी छत्तीसगड येथे भार उत्तलन स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यात स्पर्धकांनी यश संपादन करित राजुरा परिसराचे नावलौकिक केले. शालिनी बोंथला हिला दोन स्वर्ण पदक तर शंकर लक्ष्मण मोहुर्ले याना एक कांस्य पदक तथा ममता गायकी हीने जिल्हास्तरीय रजत व राज्य स्तरीय कास्य पदक पटकविले आहे. यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल माजी आमदार अँड संजय धोटे (Adv.Sanjay Dhote) यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा विशेष सन्मानचिन्ह सह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत जिम संचालक तथा ट्रेनर रुपेश करडभुजे, विद्यार्थी शंकर लक्ष्मण मोहुर्ले, विद्यार्थिनी शालिनी बोंथला व ममता गायकी यांचा सत्कार करण्यात आला. माजी आ. धोटे यांनी सर्वांचे अभिनंदन करत यशस्वी वाटचालीचा शुभेच्छा दिल्या. (Former MLA and Honored by Adv.Sanjay Dhote)
 
        यावेळी काँस्ट जिमचे संचालक तथा टेनर रुपेश उर्फ बंटी करटभुजे यांच्या सह गणेश लडके, प्रज्वल चोखारे, विनोद जाधव, नरेश झाडे, केतन आस्वले, अरविंद शेरकी उपस्थित होते तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका महामंत्री दिलिप वांढरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जनार्धन निकोडे, तालुका अध्यक्ष सचिन शेंडे भाजयुमो, संदीप पारखी जिल्हा महामंत्री ओबीसी आघाडी, युवा शहर पदाधिकारी विलास खिरटकर, गणेश रेकलवार, रवि गायकवाड चुनाळा ग्रामपंचायत सदस्य प्रमुख, संजय समर्थ, महेश वासेकर, पराग दातारकर यांच्या सह ईतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top