Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गळफास घेत व्यापाऱ्याने केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बस स्टॅन्डवर चालवीत होता नाथजल नावाने दुकान आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ३१ ऑगस्ट २०२३) -         राजुरा-बल्लारशाह मार्गावरील...
बस स्टॅन्डवर चालवीत होता नाथजल नावाने दुकान
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ३१ ऑगस्ट २०२३) -
        राजुरा-बल्लारशाह मार्गावरील हनुमान नगर समनता बार मागील परिसरात राहणाऱ्या एका इसमाने आज दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातील स्वयंपाक खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. मृतकाचे नाव वसंत बाळकृष्ण वाणी वय ४९ असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचा वेळेस वसंत वाणी हे घरात एकटे होते. आत्महत्या वेळेस पत्नी कामानिमित्य बाहेर गेली होती आणि अपत्ये शाळेत गेली होती. (A shop named Nathjal was running at the bus stand)

        मृतक वसंत वाणी यांचे (Nath Jal) नाथजल नावाने पाण्याच्या बॉटलचे दुकान आहे. दुपारी दुकान बंद करून वसंत वाणी हे घराकडे गेले होते. नंतर त्यांनी घरात गळफास घेत आत्मत्या केल्याची माहितीच सामोरे आली. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम व इतर पोलिसांनी पंचनामा करण्यात सुरुवात केली आहे. मृतकाच्या मागे पत्नी आणि तीन मुली आहे. (suicide) (Police Station Rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top