Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नाका नं. ३ जवळ पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हत्या की आत्महत्या? पोलीस यंत्रणा तपासात गुंतली आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ३० ऑगस्ट २०२३) -          येथील नाका क्रमांक तीन...
हत्या की आत्महत्या? पोलीस यंत्रणा तपासात गुंतली
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ३० ऑगस्ट २०२३) - 
        येथील नाका क्रमांक तीन जवळ संतोष विधाते यांचे जुने रिकामे घर आहे. यांच्या घरी एका अज्ञात इसमाचा फाशी लागलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू जवळपास चार-पाच दिवसांपूर्वी झाला असावा. मृतदेह कुजल्यामुळे मृतदेहातून वास सुटू लागली. वास कशाची येतेय याचा शोध शेजाऱ्यांनी घेतल्यानंतर त्यांना संतोष विधाते यांच्या निर्जन घरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घरमालक संतोष विधाते यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून वृत्त प्रकाशित होत पर्यंत मात्र मृतकाचे ओळख पटली नव्हती. परिविक्षाधीन पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र जोशी, वाकडे सर, ओमप्रकाश गेडाम, मेजर आत्राम व अन्य पोलीस कर्मचारी तपासकार्यात लागले आहे. (Murder or suicide? The police system was involved in the investigation)

        ही घटना हत्या आहे कि आत्महत्या याचा छडा पोलीस लावत असून अज्ञात व्यक्तीने दुसऱ्याच्या घरी जाऊन आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातील सत्य शोधणे पोलिसांसमोर आवाहन आहे. (Police Station Rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top