Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामबाग विकास व उपक्रम समितीकडून रामबागेत वृक्षारोपण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २७ ऑगस्ट २०२३) -         शहरातील रामबाग येथे रामबाग विकास व उपक्रम समिती रामनगर कॉलनी कडून दरवर्...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २७ ऑगस्ट २०२३) -
        शहरातील रामबाग येथे रामबाग विकास व उपक्रम समिती रामनगर कॉलनी कडून दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही वृक्षारोपण करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून रामबाग परीसरात वृक्षारोपण करुन त्यांचे संगोपन व संवर्धन करण्यात येत असते. याच माध्यमातून अनेक वृक्ष मोठे झाले असून रामबागेच्या सौंदर्यात भर पडत आहे. (rajura)

        रामबाग विकास व उपक्रम समिती रामनगर कॉलनी चे ज्येष्ठ सभासद तथा माजी नगराध्यक्ष अरूण धोटे (arun dhote) यांचे प्रमुख उपस्थितीत हे वृक्षारोपण पार पडले. प्रसंगी समितीचे अध्यक्ष किरण ढूमणे, सचिव किरण बरडे, सदस्य प्रा.डॉ. संजय गोरे, ॲड. प्रशांत अटाळकर, पत्रकार मंगेश बोरकुटे, सतीश कुचनकर, प्रवीण बुक्कावार, अशोक डोमडे, किशोर हिंगाणे, रामभाऊ पत्तीवार, ताजने सर, डॉ. अमृत गोरे, संतोष गटलेवार, संजय भोजेकर, सुहास बोबडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. समितीकडून नैसर्गिक संगोपणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top