Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा नियतक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा वन विभागाची कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २७ ऑगस्ट २०२३) -         राजुरा नियत वन परिक्षेत्राचे कक्ष क्रमांक १५६...
राजुरा वन विभागाची कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २७ ऑगस्ट २०२३) -
        राजुरा नियत वन परिक्षेत्राचे कक्ष क्रमांक १५६ मधून रेतीची ट्रॅक्टरने तस्करी करीत असताना गस्तीवर असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर पकडून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त केले आहे. 

        रात्रीचे वेळीस राजुरा वनक्षेत्रात काही तस्कर रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली त्या अनुषंगाने वनकर्मचारी मार्गावर पाळत ठेवून होते. दरम्यान 25 अगस्त रोजी रात्री दोन वाजताच्या दरम्यान वन गस्त करीत असताना कक्ष क्रमांक 156 मधून रेती भरून वाहतूक करीत असलेले एक ट्रॅक्टर पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना यश मिळाले. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक राजुरा येथील सोनिया नगर वार्डातील सलमान गुलजार खान पठाण आणि ट्रॅक्टर चालक रमेश बोरकुटे, मजूर विलास बावणे, शंकर गोत्तावार, नरेश जांगमवार, इरफान पठाण यांचे विरुद्ध वन गुन्हा दाखल करून रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. मात्र वन कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक्टर क्रमांक व ट्राली क्रमांक देण्यात आले नाही. 

        सदरची कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते, वनरक्षक पवन मंदुलवार, एस.व्हीं. गज्जलवार, संदीप तोडासे, एम.ए. चापले, वनमजूर नरेश निखाडे, भाउराव लांडे यांनी केली पुढील तपास सुरू आहे. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top