Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जनसंवाद पदयात्रा ठरणार ऐतिहासिक - जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा जिल्हा काँग्रेसचा संकल्प आमचा विदर्भ - अनंता गोखरे प्रतिनिधी चंद्रपूर (दि. २६ ऑगस्...
केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा जिल्हा काँग्रेसचा संकल्प
आमचा विदर्भ - अनंता गोखरे प्रतिनिधी
चंद्रपूर (दि. २६ ऑगस्ट २०२३) -
        महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर दि. ३ ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान 'जनसंवाद पदयात्रा' चे आयोजन करण्यात येते आहे. ही जनसंवाद पदयात्रा ऐतिहासिक ठरणार असून पदयात्रेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प असून राष्ट्रीय, राज्य पातळी ते स्थानिक पातळीवरील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, शासन पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार व अन्य समस्यांवर जनतेशी संवाद साधून जनभावना जाणून घेणे या पदयात्रेचा उद्देश आहे अशी माहिती चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote) यांनी दिली. (Resolution of District Congress to create public awareness against the injustice of Central and State Government)

        ते पुढे म्हणाले की, ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर दररोज किमान २५ किलोमीटरची असेल, या यात्रेचे नियोजन खालील प्रमाणे असेल. पदयात्रेची सुरूवात सकाळी ६ वा. प्रार्थना होईल. सकाळी ६.३० ते ९.३० वा. पदयात्रेचा पहिला टप्पा सुरू होईल. दुपारी १२ ते २ वा. जाहिर सभा, दुपारी ३ ते ४ वा. भेटीगाठी, सायं. ४ ते ७ वा. पदयात्रेचा दुसरा टप्पा पार पडेल, सायं. ७.३० ते ९.३० वा. जाहिर सभा असे एकूण नियोजन असेल. या पदयात्रेत विभागीय पदयात्री, जिल्हा पदयात्री, विधानसभा पदयात्री अशा तीन टप्प्यांत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
        जनसंवाद पदयात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. ३ सप्टेंबर २०१३ रोजी सुरू करण्यात येणार आहे. यात्रेची सुरूवात जिल्ह्यातील ऐतिहासीक स्थळापासून होईल. यात्रेत जिल्ह्यातील मान्यवर नेते, आजी माजी खासदार / आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, आघाडी संघटना, सेल व विभाग संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश असेल. ही यात्रा लोकभावना जाणून घेण्यासाठी असल्याने यात्रेत महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी मुद्दे व स्थानिक पातळीवरील जनसामान्यांचे प्रश्न, मुद्यांबाबत लोकांसोबत संवाद साधण्यात येणार आहे. (chandrapur)

        या वेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सतीश वारजुरकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, दिनेश चोखारे, सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष रामु तिवारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, प्रविण पडवेकर, नरेन्द्र बोबडे, कुणाल रामटेके, चंद्रपूर तालुकाध्यक्ष शमकांत थेरे, मतीन कुरेशी, अनुसूचीत जाती महिला जिल्हाध्यक्ष निशाताई धोंगडे एन एस यु आय जिल्हाध्यक्ष शफक शेख यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top