Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खाजगी ई-ऑटो व महिला बचत गटांच्या ई-ऑटोवर कार्यवाही करणे तात्काळ थांबवा!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची निवेदनाद्वारे मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा...
शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची निवेदनाद्वारे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपुर (दि. ९ सप्टेंबर २०२३) -
        येथील खाजगी ई-ऑटो व इतर वाहनांवर कुठलीही कार्यवाही न करता, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फक्त महिला बचत गटांच्या ई-ऑटोवर कार्यवाही करणे अन्यायकारक असून तात्काळ थांबविण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांना करतांना यावेळेस शिवसेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, वैद्यकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, उपतालुका प्रमुख अविनाश ऊके, उपतालुका प्रमुख सुरेश खापर्डे, उपतालुका प्रमुख बंडू पहानपाटे व राजू रायपुरे यांची उपस्थिती होती. (Shiv Sena Chandrapur Taluka Chief Santosh Parkhi's demand through statement of Chandrapur Sub Regional Transport Officer More)

        केंद्र शासनाच्या ई-वाहन चालना देणारा महत्वकांक्षी प्रकल्प महिला बचत गटांनी ई-ऑटो चालवून जनतेमध्ये जनजागृती करून, प्रदूषण मुक्त  व पर्यावरण वाचवण्याच्या उद्देशाने ई-ऑटो चालवीत आहे. चंद्रपूरात ई-ऑटो मालवाहक लोडर इत्यादी वाहने व अपंगांना पालकमंत्री यांनी ई ऑटो वाटप केलेले आहे.

        चंद्रपुरातील खाजगी ई-ऑटो व इतर वाहने असून त्यांच्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कुठलीही कारवाई न करता फक्त महिला बचत गटाच्या ई ऑटोवर कारवाई करणे सुरू आहे, असे महिला बचत गटाचे म्हणणे आहे. जेव्हा की, नियम हा सर्वांसाठी सारखा असतो. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फक्त महिला बचत गटांच्या ई-ऑटोवर कार्यवाही करणे तात्काळ थांबविण्यात यावी. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. (chandrapur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top