Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल - शालेय मंत्रिमंडळ नियुक्ती समारंभाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हर्ष हिरादेवेची हेडबॉय व मिस लतिका कटोळे ची हेडगर्ल म्हणून निवड आमचा विदर्भ -धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. ९ सप्टेंबर २०२३) ...
हर्ष हिरादेवेची हेडबॉय व मिस लतिका कटोळे ची हेडगर्ल म्हणून निवड
आमचा विदर्भ -धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ९ सप्टेंबर २०२३) -
        विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व आणि जबाबदारीचे गुण रुजवण्यासाठी गडचांदूर येथील आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलच्या शालेय मंत्रिमंडळाचा नियुक्ती समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. हेड बॉय आणि हेड गर्ल, मंत्री, विविध सभागृहांचे कॅप्टन आणि उपकर्णधार यांच्यासह एकूण 20 परिषद सदस्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. क्रीडा शिक्षक नीलेश बोधे यांनी नवनिर्वाचित हेड बॉय हर्ष हिरादेव व हेड गर्ल मिस लतिका कटोळे व शाळेच्या मंत्रिमंडळ परिषदेला राष्ट्रनिष्ठेची शपथ दिली. प्राचार्या सौ. अर्चना गोलछा यांनी नवनियुक्त विद्यार्थी परिषदेचे अभिनंदन करून शाळेची उज्ज्वल परंपरा यशस्वीपणे पुढे नेण्याचे आवाहन केले. (Aditya Birla Public School) (Selection of Harsh Hiradeve as Head Boy and Miss Latika Katole as Head Girl)

        यावेळी गतवर्षीची बेस्ट हाऊस ट्रॉफी हाऊस मास्टर जयंत नावळेकर यांना देण्यात आली, 100% उपस्थितीचे प्रमाणपत्र, एनसीसी सहभाग प्रमाणपत्र व शैक्षणिक उत्कृष्टता प्रमाणपत्र व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाची ट्रॉफी देण्यात आली. वेदांती मंदे व वैदेही मंदे यांनी सीसीए एक्टिविटी प्रभारी जिबी जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संचालन केले. (korpana) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top