Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा पोलिसांची मोठी कारवाई - १७ मोटारसायकल सह तीन आरोपी अटकेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. 9 सप्टेंबर 2023) -         स्थानिक सोनिया नगर निवासी पवन वडगुरे हे त्यांच्या स्पेलण्डर मोटारसायक...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 9 सप्टेंबर 2023) -
        स्थानिक सोनिया नगर निवासी पवन वडगुरे हे त्यांच्या स्पेलण्डर मोटारसायकल ने पोलीस भरतीच्या प्रॅक्टिस करीता ज्योतिबा फुले शाळेच्या गेट समोर गाडी उभी करत हॅण्डल लॉक लावून शाळेतील पटांगणात गेले होते व प्रॅक्टिस झाल्यानंतर बाहेर आल्यावर गेट जवळील त्यांची मोटारसायकल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी गाडीचा शोध घेतला पण गाडीचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत केली. लागलीच पोलिसांनी शोध मोहीम राबवित तीन आरोपींनी ताब्यात घेत त्यांची झाडा-झडती घेतली असता त्यांच्याकडून इतर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरल्याची माहिती समोर आली. राजुरा पोलिसांनी आरोपींकडून 17 मोटारसायकल हस्तगत करीत चोरीचा छडा लावला आहे. पवन वाडगुरे यांनी मोटारसायकल नंबर MH-34, AT-3493 मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवीत शोध मोहीम राबविली. यात त्यांनी होमेश्वर उर्फ हर्षल नामदेव देवतळे व मिलिंद जयभारत डंभारे दोघेही कोरपना तालुक्यातील लोणी गावातील युवकांना ताब्यात घेतले. त्यानंतर देवाडा निवासी अलबस जावेद शेख याच्या सुध्दा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हे तिघेही आरोपी 27 ते 30 वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. या तिघांनी फिर्यादी  गाडीसह इतर जिल्ह्यातील 16 मोटारसायकल चोरल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून 17 गाड्या जप्त करण्यात आल्या असून सव्वा आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, सफौ. खुशाल टेकाम, पोहवा. किशोर तुमराम, पोहवा. सुनील गौरकार, पोशी महेश बोलगोडवर, पोशी रामराव बिंगेवाड, पोशी तिरुपती जाधव आदी पोलीसांनी केली. (Police Station Rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top