Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत इन्फंट काॅन्व्हेंटचा द्वितीय क्रमांक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. ९ सप्टेंबर २०२३) -         राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित तालुका स्तरीय विज्...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. ९ सप्टेंबर २०२३) -
        राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित तालुका स्तरीय विज्ञान नाटयोत्सव 2023- 24 शिक्षण विभाग, पंचायत समिती राजुरा द्वारा इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे आयोजित करण्यात आले होते. यात एकूण १४ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून इन्फंट काॅन्व्हेंट च्या सीबीएसई शाखेतील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. इन्फंट काॅन्व्हेंट च्या संघात कु. क्रांती लिहितकर, कु. तनवी चटके, कु. आस्था चांदेकर, यथार्थ ढवस, प्रेषिक आलाम, अविष्कार चव्हाण, समीर बोडेकर, प्रियांशू मेश्राम यांनी अश्विनी फासला, सुषमा साळवे, सरोज गाडगे या शिक्षिकेच्या  मार्गदर्शनाखाली नाटकाचे सादरीकरण केले. 

        विद्यार्थ्याच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote), सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे (Arun Dhote), संचालक अभिजीत धोटे, सी बी एस ई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी,  या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Infant Jesus English High School Rajura) (aamcha vidarbha)








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top