Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बंजारा समाजाच्या वतीने तिज महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पार पडले बक्षीस वितरण आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. ९ सप्टेंबर २०२३) -         संत शिरोमणी सेवाला...
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पार पडले बक्षीस वितरण
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. ९ सप्टेंबर २०२३) -
        संत शिरोमणी सेवालाल महाराज सेवा समिती व गौर बंजारा सेवा समिती राजुरा च्या वतीने तिज महोत्सव ढंबोळी पीडिया खासिरो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बंजारा समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य रामराव महाराज, बाबूसिंग महाराज यांच्या प्रतिमेला नमन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सदर कार्यक्रम दिनांक ३० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२३ पर्यंत घेण्यात आला. 

        या प्रसंगी आयोजकांच्या वतीने विविध स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा  महिला मुले मुली इत्यादींच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रम व स्पर्धेतील विजेत्यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. 

        या प्रसंगी प्रकाश जाधव, प्रभाकर चव्हाण, श्याम गरडे, हरिचंद्र राठोड, दत्ता चव्हाण, तिरुपती जाधव, विष्णू जाधव, बडीराज आडे, अनिल राठोड, संतोष जाधव, यासह मोठया संख्येने समाज बांधव, महीला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीलाताई जाधव यांनी केले. संचालन उद्धव राठोड तर आभार प्रदर्शन नामदेव जाधव यांनी केले. (Rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top