Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: JCI राजुरा रॉयल्सच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला रक्तदान शिबिरात सहभाग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १० सप्टेंबर २०२३) -         माजी आमदार सुदर्शन निमकर (Sudarshan Nimkar) यांच्या वाढदिवसानिमित्त ...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १० सप्टेंबर २०२३) -
        माजी आमदार सुदर्शन निमकर (Sudarshan Nimkar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य निदान व रक्तदान शिबिरात JCI राजुरा रॉयल्सच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. निमकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांनी हजेरी लावत रुग्णांची आरोग्य तपासणी केली, JCI राजुरा रॉयल्स ने या कार्यक्रमात मोठी भूमिका बजावत रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी JCI राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा मधूस्मिता पाढी, सचिव प्रफुल्ला धोपटे, झोन ट्रेनर श्वेता जयस्वाल, सुषमा शुक्ला, सुशिला पोरेड्डीवर, ज्योति मेडपल्लीवार, स्वरूपा झंवर, स्मिता चव्हाण, मंजू गौतम, रितू पानथरे, जयश्री शेंडे, स्मृती व्यवहरे, आशा चंदेल, राधा विरमलवर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top