Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जालना लाठीहल्ला - मराठा समाजाच्या जिवतीत निषेध मोर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जरांगे पाटिल यांच्या उपोषणाला समर्थन आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे जिवती (दि. १२ सप्टेंबर २०२३) -         जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी ...
जरांगे पाटिल यांच्या उपोषणाला समर्थन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
जिवती (दि. १२ सप्टेंबर २०२३) -
        जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटिल हे उपोषण व मराठा आरक्षण आंदोलन करीत असताना शासनाने केलेल्या लाठीहल्ला व मारहाणीचा निषेधार्थ दिनांक 11 सप्टेंबर 2023 ला निषेध मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आबेंडकर, रामराव महाराज, वीर बापुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत तहसिल कार्यालयावर हाजारोच्या संख्येने मोर्चा धडकला. तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्च्याला येथील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. (Support Jarange Patil's hunger strike)

       मोर्चात प्रामुख्याने माजी जिप सदस्य अविनाश जाधव, प्राचार्य डॉ.सभांजी वारकड, किरण पवार, महेश देवकत्ते, महेबुब शेख, अंकुश गोतावळे, सुदाम राठोड, गोविंद टोकरे, मारोती बेल्लाळे, सुग्रीव गोतावळे, अशपाक शेख, जमालुद्दीन शेख, राजेश राठोड उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज जिवती येथील उत्तम कराळे, प्रा. पांडुरंग सावंत, पांडुरंग वारकड, भरत बिरादार, विष्णु घोगरे, आनंदराव गुरसुडे, शिवाजी जावळे, शंकर चव्हान, रामदास घोगरे, राजु बिरादार, लक्ष्मण शिंदे, ओम जाधव, परमेश्वर सूर्यवंशी, गणेश कदम, आनंद कदम, पुंडलीक गिरमाजी, हरिचंद्र जाधव, गोविंद ठोंबरे, जयराम ठोंबरे, हरिचंद्र माने, शशिकांत आगलावे, व्यकंटी भदाडे, परमेश्वर भदाडे, वैजनाथ कदम, किशोर वाळके, तिरुपती बाचिफळे, रामेश्वर डुरे, व्यंकटी कौउडगावे, रामेश्वर बुच्चे, सुनिल शेळके व मराठा समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top