Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोकसहभागातून नोकारी खुर्द मार्गे जाणाऱ्या प्रमुख मार्गांची दुरुस्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपसरपंच वामन तुराणकर यांच्या पुढाकारातून झाले काम पूर्ण आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. ८ सप्टेंबर २०२३) -    ...

उपसरपंच वामन तुराणकर यांच्या पुढाकारातून झाले काम पूर्ण
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ८ सप्टेंबर २०२३) -
        तालुक्यातील नोकारी खुर्द हे गाव जिवती व कोरपणा कडे जाणाऱ्या मार्गांवर बसलेलं गाव आहे. या मार्गावरील नोकारी बु., बाम्बेझरी, लिंगनडोह व आसापूर हे गाव वसलेले आहे. या मार्गाची अत्यंत दुरावस्था होऊन मोठे खड्डे पडलेले होते. तसेच रस्त्याच्या कडेला जंगली झुडपांची मोठी वाढ झाली होती. यामुळं जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन नोकारी खु. चे उपसरपंच तुराणकर यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून या मार्गाची दुरुस्ती करून जनतेचा प्रवास सोईचा करून दिला आहे. (The work was completed on the initiative of Upasarpanch Vaman Turankar)

        नोकारी बु., बाम्बेझरी, लिंगनडोह व आसापूर हे दुर्लक्षित गावे असून येथे विकासकामे बाकी आहेत. अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र निष्ठूर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही झाली नसल्याने नाकगरिकांनी एकत्र येत माणिकगड सिमेंट कंपनी ची मदत घेत रस्त्यावरील खड्डे गिट्टी व मातीने भरण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले जंगली झुडूप तोडून रस्ता मोकळा करण्यात आला. माणिकगड कंपनी कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जे.सी.बी. मशीनद्वारा रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूने नाली तयार करण्यात आली. लोकसहभागातून झालेल्या या लोकपयोगी कार्याचे कौतुक होत आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top