Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. राजेश लांजेकर यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -         राजुरा तालुका बार असोसिएशन राजुरा ची नवनिर्वाचीत कार्यकारणी स्थापित क...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -
        राजुरा तालुका बार असोसिएशन राजुरा ची नवनिर्वाचीत कार्यकारणी स्थापित करण्यात आली. या मध्ये नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर, उपाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर चांदेकर, सचिव ॲड. रवींद्र टिपले सहसचिव ॲड. शंतनु देशमुख, कोषाध्यक्ष ॲड. यशवंत खोके यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

        आज दिनांक ०८/०९/२०२३ ला राजुरा बार असोसिएशन राजुरा रजि. न. २४४/२०१० (चंद्रपूर) तह राजुरा जिल्हा चंद्रपूर येथिल ग्रंथालयात मासिक बैठक घेण्यात आली. सन १९५६ मध्ये राजुरा बार असोसिएशन राजुरा ची स्थापना  करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत दहा अध्यक्षानी आपला यशस्वी कार्यकाळ उत्तमरित्या पूर्ण केला आहे. राजुरा बार असोसिएशन ला खूप जुना इतिहास आहे. अधिवक्ता संघ हे अधिवक्ता आणि लोकाभिमुख कार्यासाठी नेहमीच कार्यशील असतात. मावळत्या कार्यकारणीत अध्यक्ष ॲड. निनाद येरणे, सचिव, उपाध्यक्ष ॲड. राकेश पिंपळकर, सचिव ॲड विजय पुणेकर, सहसचिव अर्पित धोटे, कोषाध्यक्ष सुजित पल्हाळे, सदस्य तुकाराम डवरे, ॲड. विशाल उपरे यांचा समावेश होता. 

        सन २०२३ पासून पुढील कार्यकाळासाठी नवनिर्वाचीत कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. या मध्ये अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर, उपाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर चांदेकर, सचिव ॲड. रवींद्र टिपले, सहसचिव ॲड. शंतनु देशमुख, कोषाध्यक्ष ॲड. यशवंत खोके, सदस्य ॲड. पद्मा मोहितकर, ॲड. वंदना जाधव, यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी उपस्थित अधिवकत्यांकडून नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा  देण्यात आल्या. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top