Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रूपये मदत करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार सुभाष धोटे यांची निवेदनाद्वारे मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २० सप...

महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार सुभाष धोटे यांची निवेदनाद्वारे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २० सप्टेंबर २०२३) -
        राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात तसेच संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना अचानकपणे सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव आल्यामुळे तीनच दिवसात संपूर्ण सोयाबीन पीके पिवळे पडून मोठया प्रमाणावर सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावल्या गेले आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. अचानक सोयाबिन पिकावर आलेल्या रोग प्रादुर्भावाने परिसरातील शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. या पिकांवर मूळखूज, खोडखुज आणि पिवळा मोज्याक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. नुकतेच शासनाने मोबाईल अँप द्वारे ई-पिक पाहणी सादर करण्याचे सुचविले होते मात्र अनेक शेतकऱ्यांकडे Android मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तसेच जिल्ह्यातील १०० % शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला नाही अशा वेळी अनेक शेतकरी बांधव पिक विम्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांवर अचानकपणे आलेल्या रोग प्रदुर्भावाच्या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सोयाबीन पिकांचे सर्व्हेक्षण करून शासनाने नैसर्गिक आपत्ती नुकसान या बाबी अंतर्गत शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एक लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote) यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (rajura) (aamcha vidarbha) (MLA Subhash Dhote's request to Maharashtra Agriculture Minister Dhananjay Munde through a statement)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top