Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारपूरात 1 कोटी 11 लाख रुपयांचा बंदी असलेला पान मसाला जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन ट्रक जप्त, चार आरोपींना अटक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स बल्लारपुर (दि. 20 सप्टेंबर 2023) -         महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याती...

दोन ट्रक जप्त, चार आरोपींना अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
बल्लारपुर (दि. 20 सप्टेंबर 2023) -
        महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे तंबाखूयुक्त पदार्थ जप्त करण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर व अमरावतीच्या दक्षता पथकाने चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई ला यश मिळाले आहे. (Nagpur and Amravati Vigilance Teams of Food and Drug Administration)

        पान मसाला असलेले सुगंधित तंबाखूने आजची तरुणपिढी नशेच्या आहारी जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी आजची तरुण पिढी आपल्या शरीरात असाध्य कॅन्सरसारखे घातक आजार घेऊन मृत्यूच्या खाईत जात आहे. तत्सम तंबाखूजन्य पदार्थ विकणारे व्यापारी आता करोडपती धन्नासेठ होत आहे. स्थानिक प्रशासन हे धन्नाशेठांचे बाहुले बनले आहे. येथून खुलेआम दररोज जाणारे ट्रक कोणी का थांबवले नाही?, 
स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना म्हणजे बाहेरून जिल्ह्यात आलेल्या दक्षता विभागाच्या पथकाने बल्लारपूर येथे सुगंधित सागर पान मसाला भरलेले ट्रक पकडण्याची कारवाई केली आहे. (Pan masala flavored tobacco)

        अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर आणि अमरावतीच्या दक्षता पथकाने चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित पान मसाल्याचे दोन ट्रक जप्त केले आहेत. TS-07 UE-7206 आणि MH-25 U-1211 क्रमांकाचा ट्रक विसापूर टोल नाक्याजवळ सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पकडला गेला. या दोन्ही ट्रकमधून 1 कोटी 11 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही ट्रक चालक व वाहकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हा माल कर्नाटकातील बिदर येथून मध्य प्रदेशात नेल्याची माहिती त्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास व कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाने बल्लारपूर यांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत. (ballarpur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top