Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सिमेंटने भरलेला ट्रक दुकानासमोरील शेडात घुसला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला गणेश चतुर्थीच्या दिवशी व्यापारी लाईन मध्ये ट्रक घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान पानटपरी, फुल स्ट...
कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला
गणेश चतुर्थीच्या दिवशी व्यापारी लाईन मध्ये ट्रक घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान
पानटपरी, फुल स्टोअर, दुकानदार यांना नुकसान भरपाई, मात्र ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर नुकसान भरपाईची मागणी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत द्वारे
गडचांदूर (दि. 20 सप्टेंबर 2023) -
        कोरपना तहसील येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आवरपूर युनिटमधील सिमेंटने भरलेला ट्रेलर मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास नांदाफाटा येथील मुख्य प्रवेशद्वारा जवळ पानटपरी, फुल स्टोअर, दुकानदाच्या शेडवर आदळला. सदर ट्रेलर ने नांदा ग्राम पंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा नुकसान पोहचविले. (A major disaster was averted as there was no loss of life)

        मिळालेल्या माहितीनुसार, आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य गेटमधून सिमेंटने भरलेला एसीएस ट्रान्सपोर्टचा ट्रेलर क्रमांक MH-40 CD-6185 ने नांदाफाटा चौकातील पानटपरी व फुलांच्या दुकानावर धडक देत ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर धडक दिल्यानंतर संतोष जनरल स्टोअर्सच्या दुकानाच्या शेडमध्ये येऊन ठेपला. जवळच्या चहाच्या दुकानात उभ्या असलेल्या लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढले आणि अल्ट्राटेक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. अचानक ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असे बोलले जात असली तरी या धडकेमुळे ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवेशद्वाराच्या खांबांना तडे गेल्याने प्रवेशद्वार केव्हाही कोसळण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे. सकाळी रस्ता पूर्णपणे रिकामा असल्याने जीवितहानी टळली. अन्यथा दिवसभर या चौकात प्रचंड गर्दी असते हे येथे विशेष. (On the day of Ganesh Chaturthi, the traders suffered losses due to the truck entering the trading line)

        काल गणेश चतुर्थी असल्याने ग्राहकांना आपले वाहन रस्त्यावरच ठेऊन पायदळी मुख्य मार्केट लाईन मध्ये यावे लागले. व्यापाऱ्यांच्या माल दुकानात आणणाऱ्या गाडयांना दुसऱ्या लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. स्थानिक नेते व पोलीस यंत्रणा तात्काळ मुख्य चौकातील ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करतील अशी स्थानिक व्यापारी व नागरिकांची आशा होती मात्र तीस तासाहून अधिक वेळ झाले असतानाही सदर ट्रक जैसे थे असल्याने लोकांची व नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पानटपरी, फुल स्टोअर, दुकानदार यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती असून मात्र ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न सुरू आहे.

        याबाबत गडचांदूरचे ठाणेदार यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, हे वाहन उचलणे सोपे काम नाही. हाताने ढकलून वाहन हलणार नाही. त्यासाठी जेसीबी, क्रेनसारख्या मोठ्या यंत्रांची गरज आहे. ट्रान्सपोर्टचे मालक आता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच्याशी बोलूनच वाहन काढले जाईल.

        मुख्य मुख्य प्रवेशद्वारा जवळील दुकानासमोर अपघातग्रस्त वाहन उभे असून ग्राहक येण्यास मार्ग नसताना दुकानदार व्यवसाय करणार तरी कसे? नांदा येथील व्यावसायिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करून लवकरात लवकर वाहन हटविण्याचे आवाहन केले आहे. (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top