Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अमृत महोत्सव मनावता, ७५ वर्षात खरंच मुक्ति मिळाली का - जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरात मुक्ति दिन अमृत महोत्सव समारोह साजरा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १८ सप्टेंबर २०२३) -         अमृत महोत्सव साजरा करता...
राजुरात मुक्ति दिन अमृत महोत्सव समारोह साजरा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १८ सप्टेंबर २०२३) -
        अमृत महोत्सव साजरा करतांना गेल्या 75 वर्षात आम्ही कुठे पोहोचलो, याचा विचार करता काहीच भूषणावह नसून लोकांपुढे आजही अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झाले आहेत. आपले वर्तमान आणि भविष्य यांचा विचार करता खरेच मुक्ति मिळाली का, असा प्रश्न सर्वांपुढे निर्माण झाला आहे. देशात प्रचंड अस्वस्थता असून आता जनतेने सध्याच्या परिस्थिती बाबत समोर येऊन प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्लीतील जेष्ठ पत्रकार अशोक वानखडे (Ashok Wankhade) यांनी केले. राजूरा येथील मुक्ति दिन अमृत महोत्सव समारोहात उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी आक्रमक शब्दात सडेतोडपणे अशोक वानखेडे यांनी आपली मते मांडली. (Rajurat Mukti Day Amrit Mahotsav celebration)

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश दहागावकर होते. प्रमुख अतिथी माजी आमदार अॅड. वामनराव चटप (Former MLA Adv. Vamanrao Chatap), आदर्श शिक्षण मंडळाचे सचिव अविनाश जाधव, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप जैन, वकील संघाचे अध्यक्ष राजेश लांजेकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, जयश्री देशपांडे, प्राचार्य दौलत भोंगळे, डाॅ.उमाकांत धोटे, प्राचार्य संभाजी वारकड, डाॅ.राजेश खेरानी उपस्थित होते. वामनराव चटप यांनी मुक्ति संग्राम, स्वतंत्रतेचे मुल्य या विषयावर भाष्य करीत सत्कारमुर्ती व त्यांना साथ देणाऱ्या परिवाराचे कौतुक केले. प्राचार्य दहागावकर यांनी निजामकालिन घटनांचा संदर्भ देत ऐतिहासिक माहिती दिली. 

        या सोहळ्यात सात सत्कारमूर्ती यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. 45 हजार रूग्णांवर डोळ्यांच्या शस्रक्रिया केलेले सेवानिवृत्त शल्य चिकित्सक डॉ. भैयासाहेब कल्लूूरवार, शौर्यचक्र प्राप्त सैनिक शंकर मेंगरे, लेेक व समीक्षक प्रा.डॉ.अनंता सूर, शुन्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक दिलीप बुुरडकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रभाकर पाचपुते, बालकांच्या आरोग्याविषयी देशात तिन पैकी निवड झालेली उच्चशिक्षित डॉक्टर डाॅ. माधुरी झंवर, अल्पसंख्य समाजाची सनदी लेखापाल सबा खान पठाण या मान्यवरांचा त्यांच्या परिवारासह शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र, साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन अशोक वानखेडे व प्राचार्य डाॅ.राजेश दहागावकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मानपत्र वाचन रेणूका देशकर, अर्चना जुनघरे, कविता शर्मा, वनिता उराडे, वैशाली भोयर, प्रविण तुराणकर व दिनेश पारखी यांनी केले.

        या सोहळ्यात जेष्ठ पत्रकार अशोक वानखेेडे, प्राचार्य राजेश दहागावकर, अॅड.वामनराव चटप यांची भाषणे झाली. पाहुण्यांचा परिचय प्रा. डाॅ.विशाल मालेकर यांनी करून दिला. स्वागतगीत व देशभक्ती गीत आरोही संगित विद्यालयाच्या संचालिका अल्का सदावर्ते यांच्या चमूने सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य दौलत भोंगळे, संचालन पुर्वा देशमुख व वैशाली भोयर व आभार मिलींद गड्डमवार यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत शिवाज्ञा वाद्य पथकाने केले.  समारोहाच्या यशस्वीतेसाठी संयोजक अनिल बाळसराफ, दिलीप सदावर्ते, गणेेश बेले, मिलींद देशकर, डाॅ.जगदीश शिंदे, बादल बेले, पियुष मामिडवार, छोटू सोमलकर, विजय मोरे, महेंद्र बोबडे, मोहन मेश्राम, रत्नाकर नक्कावार, प्रा.सुनिता जमदाडे, स्वरूपा झंवर, अनुष्का रैच, जयश्री मंगरूळकर, प्रिया मामिडवार, नंदीनी मडावी, शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top