Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळगाव ने पटकावला द्वितीय क्रमांक यशाची परंपरा राखली कायम आमचा विदर्भ -धनराजसिंह शेखावत तालुका प्रति...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळगाव ने पटकावला द्वितीय क्रमांक
यशाची परंपरा राखली कायम
आमचा विदर्भ -धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ९ सप्टेंबर २०२३) -
        तालुका स्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव दिनांक 8/09/2023 ला पंचायत समिती सभागृह कोरपना येथे पार पडला. त्यात  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळगाव येथील विद्यार्थ्यानी द्वितीय क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम राखली आहे.

        विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करून विज्ञानाच्या विचाराचे आदान-प्रधानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव घेण्यात आला. यातील प्रमुख विषय हा मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा होता. त्या मध्ये 'श्री अन्न श्रेष्ठ अन्न' यावर जिल्हा परीषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या महोत्सवात कोरपना तालुक्यातील 18 शाळांनी आपला सहभाग दर्शविला होता. या यशामध्ये  पंचायत समिती कोरपनाचे गटविकास अधिकारी विजय पेंदाम, गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी, पंढरी मुसळे, प्रशिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रेरणेने व शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोरे, विज्ञान विषय शिक्षक बाळकृष्ण गावंडे, विजय आकनुरवार, कु.रेखा झाडे, मंगला चटप व निलेश मडावी यांचे अथक मार्गदर्शन व विद्यार्थ्याच्या सरावातील सातत्य व शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोत्साहन यामुळेच हे यश संपादन करता आले. विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. (korpana) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top