Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुऱ्यात आणखी एका मजुराची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंधरवड्यात चौथ्या आत्महत्येच्या घटनेने शहर हादरले आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -         शहरात तीन आत्महत्ये...

पंधरवड्यात चौथ्या आत्महत्येच्या घटनेने शहर हादरले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -
        शहरात तीन आत्महत्येच्या घटना ताज्या असतांना आणखी एका मजुराने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मनोज कन्नाके वय २८ वर्षे असे मजुराचे नाव आहे. पंधरवड्यात चार आत्महत्येच्या घटना घडल्याने शहर चांगलेच हादरले आहे. मुळात आत्महत्ये मध्ये गरिबांसह श्रीमंतांचा सहभाग असल्याने अखेर या आत्महत्येच्या घटनांमध्ये दडलंय काय असा सामान्य जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहे. (suicide)

        मागील आठवड्यात आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहे. गडचांदूर रोड लगतच्या कुलूपबंद विधाते यांच्या घरात गळफास लावलेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर लगेच वसंत वाणी नामक व्यावसायिकांने घरात आत्महत्या केली. या दोन्ही घटना ताज्या असताना सुरेश पाचभाई नामक कर्मचाऱ्यांने वर्धा नदीत उडी मारून आत्महत्या केली. आता चौथी घटना समोर आली असून मनोज कन्नके या २८ वर्षीय मजुराने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तो सोमनाथपुर वार्डातील रहिवासी होता. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दरम्यान पंधरवड्यात आत्महत्येच्या चार घटना समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. या आत्महत्या मध्ये गरीब मजुरासह व्यापारी व गर्भ श्रीमंत सुध्दा जीव देत असल्याने अखेर या आत्महत्ये मध्ये दडलंय काय असा चिंतनाचा विषय ठरू पहात आहे. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top