Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोंडवाना विद्यापीठाचा जिल्हा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार राजुराच्या प्रज्वल बोबडे ला जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री शिवाजी महाविद्यालय राजूराचा आहे विद्यार्थी  आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. २६ सप्टेंबर २०२३) -         श्री शिवाजी कला वा...

श्री शिवाजी महाविद्यालय राजूराचा आहे विद्यार्थी 
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. २६ सप्टेंबर २०२३) -
        श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक प्रज्वल सुभाष बोबडे याला २०२२-२३ वर्षातील गोंडवाना विद्यापीठाचा चंद्रपूर जिल्हा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २ ऑक्टोबर ला होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. प्रज्वल बोबडे यांनी बी.ए. ला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना च्या विविध उपक्रमातून प्रेरणा घेत, राष्ट्रीय सेवा योजना मार्फत महाविद्यालयात होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग होत असत. प्रज्वल ने राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून राज्यस्तरावरील विविध शिबिरात सहभाग घेतला, राज्य आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान जळगाव, राज्य साहसी क्रीडा शिबिर चिखलदरा, राज्यस्तरीय सामाजिक-सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष सोलापूर, प्रेरणा शिबिर नागपूर अशा विविध शिबिरात सहभाग घेत महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे नावलौकिक केले.

        हर घर तिरंगा, वृक्षारोपण, तंबाखू व्यसन मुक्तीसासाठी जनजागृती पर कार्यक्रम स्वच्छता अभियान, एड्स जनजागृती रॅली असे विविध जागरूकतापर कार्यक्रमात हिरहिरीने सहभाग घेत आहे. या संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध जागरूकता कार्यक्रम राबविताना गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर आर खेराणी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ. सारिका साबळे याचे मार्गदर्शन लाभले. प्रज्वलच्या या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, आई वडील, स्वयंसेवक मित्र मैत्रिणी यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top