Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गणेश उत्सव सेवा प्रकल्पात आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २५ सप्टेंबर २०२३) -        चंद्रपूर...
मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २५ सप्टेंबर २०२३) -
       चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने व सामाजिक वनीकरण अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सव सेवा प्रकल्प राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट युनिट लीडर बादल बेले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. यावेळी राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुरज जाधव (Dr. Suraj Jadhav), प्रशासकीय अधिकारी तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर (Vijayakumar Jambhulkar) यांची उपस्थिती होती. (Principal Dr. Suraj Jadhav interacted with the students)

        यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांशी संवाद साधत मुख्याधिकारी डॉ. जाधव म्हणाले पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून निर्माल्य संकलन करावे तसेच नगर परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच गणेश भक्तांनी आपल्या घरगुती गणेशाचे विसर्जन करून सहकार्य करावे याकरिता विध्यार्थ्यांनी आपआपल्या परिसरातील नागरिकांनी याविषयी माहिती देऊन प्रत्येकांनी पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलन कार्य, दर्शनासाठी भक्तांना रांगेत लावण्यासाठी मदत करणे, सफाई श्रमदान मोहीम व प्रसाद वितरणात मदत, नागरिकांना प्रथमोपचार माहिती यासह इतरही सेवाकार्य विषयी माहिती बादल बेले यांनी दिली. यावेळी स्काऊट मास्तर रुपेश चिडे, गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे, सहायक शिक्षक विकास बावणे, जयश्री धोटे, भाग्यश्री क्षीरसागर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राष्ट्रीय हरित सेना विभागातील व स्काऊट गाईड च्या विध्यार्थ्यांनी सहकार्य केले. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top