Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: फूटबॉल स्पर्धेत अंबुजा विद्या निकेतन शाळेचे वर्चस्व
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपरवाही येथे तालुकास्तरीय फूटबॉल स्पर्धेचे आयोजन 14,17 व 19 वर्षाखालील तिन्ही गटात अंबुजा विद्या निकेतन शाळा प्रथम  आमचा विदर्भ - धनराजसिंह ...
उपरवाही येथे तालुकास्तरीय फूटबॉल स्पर्धेचे आयोजन
14,17 व 19 वर्षाखालील तिन्ही गटात अंबुजा विद्या निकेतन शाळा प्रथम 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २६ सप्टेंबर २०२३) -
        अंबुजा विद्या निकेतन उपरवाही  येथे तालुका स्तरीय फूटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूर आणि आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवरपूरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये अंबुजा विद्या निकेतन उपरवाही या शाळेचे वर्चस्व दिसून आले. यात 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील, 19 वर्षाखालील या तिन्ही गटात प्रथम क्रमांक प्राप्त केले. ही स्पर्धा तालुका सचिव प्रमोद वाघडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, यावेळी अंबुजा विद्या निकेतन चे प्राचार्य राजेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

        14 वर्षाखालील संधामध्ये आर्यन बोरीकर (संघनायक) मोहम्मद सयान, सार्थक राठोड, भार्गव थीपे, संयम साह, शिवानंद, श्रेयांश, देवांश, कल्याण पिंपळशेंडे, अनुराग रतीश, अंबिकेश, पार्थ शुक्ला, अभिषेक शर्मा, अनीश शर्मा, आयुष बरई लौकिक, शोएब अली होते. 17 वर्षाखालील संघामध्ये ईशान तपासे (संघनाय ) अभिषेक चौधरी, आयुष बधेल, सुरज पासवान, जयन्त, महेंद्र पाल, आदित्य साह, पुष्पम, आयुष सिंह, अर्जुन, दुर्गेश पांडे, नारायण पांडे, ओम, गौरव कृष्णा तसेच 19 वर्षाखालील मध्ये कमलाकांत, शिव रॉय, कार्तिकेय बुरघाटे, सोनू तिवारी, सुमीत शर्मा, अंशू साह, नितिश साह, राज चौधरी, रोशन, सौरभ, मंधन थिपे और सुरज यादव या विदयार्थ्यांचा सामावेश होता.

        विद्यालयाचे शारिरीक शिक्षक हेमंत जंघेल यांनी प्रशिक्षण दिले. या यशाबद्दल राघवेंद्र राव जहागीरदार सी.एम.ओ., एम.सी डब्ल्यू, राजेश शर्मा प्राचार्य अंबुजा विद्या निकेतन, उप्परवाही तसेच विद्यालय समन्वयक अंबर त्रिवेदी आणि सर्व शिक्षकवृद यांनी हार्दिक अभिनंदन केले.gadchandur) (aamcha vidarbha)




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top