Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजूरात प्रथमच महिलांनी फोडली दहीहंडी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दहीहंडी उत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा माजी आमदार अँड संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे  राजुरा (दि. ...
दहीहंडी उत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा
माजी आमदार अँड संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे 
राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -
        गोकुळाष्टमीच्या निमित्तानं शहरातील मामा तलावाजवळील भारत लॉजच्या बाजुला,शिवाज्ञा वाद्य पथक व शिवाज्ञा दहीहंडी उत्सव समिती राजुराच्या माध्यमातून आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांनी प्रामुख्याने उपस्थित होऊन मोठ्या संख्येने जमलेल्या बालगोपाळांसोबत आनंद द्विगुणित केला. (Former MLA and Sanjay Dhote mainly present)

या प्रसंगी दहीहंडी उत्सव समितीच्या कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णच्या प्रतिमेचे पुजण करून तथा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे व माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांच्या हस्ते दही हंडीच्या उत्सवाला सुरुवात झाली. यात शहरात प्रथमच दहीहंडी उत्सवात महिलांनी सहभाग नोंदवत दहीहंडी फोडली. (rajura) (Shri Krishna Janmashtami)

        या प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, डॉ. उमाकांत धोटे, जाधव, जनार्धन निकोडे, नप माजी शिक्षण सभापती राधेश्यामजी अडानिया, दिलिप वांढरे, महादेव तपासे, संदीप पारखी, सचिन शेंडे, रवी गायकवाड यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. (aamcha vidarbha)

        यावेळी उत्सव समितीचे प्रमुख पियुष संतोष मामिडवार (पालेवार), सुमित गुरुनुले, यश गौरकार, अमोल ढोले, ओम झोडे, सुरज कन्नाके, अमी भगत, रोशन डिगे, सुरज टेकाम, प्रेम चंदनखेडे, क्षितीज माडवणकर यासह शिवशाही दहीहंडी महिला मंडळ राजुरा यांच्या सर्व चमू उपस्थित होते. राजुरा शहरातील असंख्य नागरिक युवक वर्ग युवती, बंधू भगिनी समस्त शहर वासियानी दंहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

बघा व्हिडीओ

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top