Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: साखरी (वाघोबा) येथे उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संघर्ष युवा विकास मंडळाची मागील २२ वर्षांची परंपरा अविरत सुरु आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -         श्रीकृष...
संघर्ष युवा विकास मंडळाची मागील २२ वर्षांची परंपरा अविरत सुरु
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -
        श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्याने साखरी (वाघोबा) येथे संघर्ष युवा विकास मंडळ द्वारे मागील २२ वर्षाच्या परंपरेनुसार यावर्षीही दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भगवान श्रीकृष्ण आणि शक्तीची देवता श्री हनुमानजी या दैवतांचे पूजन करून DJ च्या तालावर गोविंदा पथकाने अतिशय उत्साहात आणि पहिल्याच प्रयत्नात शेकडो कृष्ण भक्तांचे उपस्थितीत दहीहंडी यशस्वीरित्या फोडून उत्सव संपन्न केला. सूरज श्रीधर गोरे या गोविंदाने दही हंडी फोडण्याचा मान पटकावला. गोविंदा पथकात मिथुन काटवले, सचिन गोरे, अमोल डेरकर, अंकुश गोरे, आशिष डोंगे, अमित निमकर, राजू गालफाडे, दिलीप काटवले, प्रीतम बेसूरवार, राकेश उरकूडे, सचिन बोबडे, बन्सी मडावी, प्रभाकर आत्राम, ज्ञानेश्वर येरगुडे, अंकित कावळे, शुभम काटवले, ज्ञानेश्वर लांडे, प्रीतम गालफाडे, प्रदीप आत्राम, आकाश कोडापे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी अँड. प्रशांत घरोटे, सुदर्शन बोबडे, अनिल गोरे, संतोष उरकुडे, पंकज गालफाडे, अमोल अडबाले, गजानन चोथले यांचेसह मंडळाचे सर्व पदाधिकारी, गोविंदा पथकांतील सर्व गोविंदा यांनी अथक परिश्रम घेतले. याबाबत मंडळाचे अध्यक्ष राजु घरोटे यांनी सर्वांचे विशेष आभार मानले. (Sangharsh Yuva Vikas Mandal's tradition of last 22 years continues) (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top