Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलिने बेकायदेशीररित्या व भूमी अधिग्रहण न करता न्यायालयात केस असतांना जबरीने ताबा घेतला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पिडीत शेतकऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुुरा (दि. २५ ऑगस्ट २०२३) -     ...
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पिडीत शेतकऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुुरा (दि. २५ ऑगस्ट २०२३) -
        राजुरा तालुक्यातील मौजा गोयगाव येथील आपली शेती नियमानुसार अधिग्रहित न करता, कसलाही मोबदला न देता आपल्या नावाने सात-बारा असतांना वेकोलि ने आपल्या शेतात पिके असतांना जबरीने डोझर व एक्सावेटर मशिन चालवून कापुस पिकांचे नुकसान करीत ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आपल्यावर अन्याय झाला असुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करीत न्याय मिळावा अशी कैफियत गोयगाव येथील शेतकरी भारती प्रकाश फुटाणे आणि किशोर वसंत नहाते या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. (The aggrieved farmers demanded action against the guilty officials in the press conference)

        दिलेल्या माहितीनुसार भारती फुटाणे यांची गोयगाव येथे भुमापन क्रमांक 135/2, आराजी एक हेक्टर एक आर आणि किशोर नहाते यांची भुमापन क्रमांक 135/1, आराजी 1हे.2आर आणि 133/1, आराजी 0.91 हेक्टर शेेतजमिन आहे. या दोघांनी सन 2003 व 2004 मध्ये तुकाराम पेटकर यांचेकडून हे शेत रजिस्टर विक्री पत्र आधारे विकत घेतले अशी माहिती फुटाणे यांनी दिली. तेव्हापासुन सदर जमिनीवर कास्त करीत असून या भुमीची वेकोलिच्या गोवरी डिप कोळसा खाणीसाठी आवश्यकता भासल्याने नियम व कायदेशीररित्या आमची शेतजमीन अधिग्रहित करायला हवी होती, मात्र वेस्टर्न कोलफील्ड् लिमिटेड ने तसे न करता, आजपर्यंत कोणतीही नोटीस न देता आणि आम्हाला मोबदला न देता पोलिस संरक्षण घेऊन आमच्या नावावर असलेल्या जमिनीवर अवैधरित्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही शेतमालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बारा तास राजुरा पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. या जमिनीचा सात बारा आमच्या नावावर असतांना, मालकी आमची असतांना आणि वेकोलि कडे कोणतेही दस्तावेज नसतांना पोलिस बळावर दहशत निर्माण करून शेतमालकांनाच बेकायदेशीरपणे बेदखल करण्यात आले. आमची जमिन पूर्ववत स्थितीत करून द्यावी आणि झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी माहिती पत्रकार परिषदेत भारती प्रकाश फुटाणे आणि किशोर वसंत नहाते यांनी केली. (Press conference)

        सदर शेतकऱ्यांनी सांगितले कि, यासंदर्भात सदर शेतकऱ्यांनी ट्रीबुनल मध्ये दाद मागितली होती. तेथे या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागुन त्यांच्या बैंक खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र वेकोलिने या शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही आणि निर्देशाचे उल्लंघन केले. यानंतर पिडीत शेतकऱ्यांनी चंद्रपूर सत्र न्यायालयात अन्यायाविरोधात केस दाखल केली. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही तिन महिण्यापेक्षा अधिक काळ आपले म्हणणे वेकोलिने मांडले नाही. अखेर दिनांक 14 ऑगष्ट 2023 ला सायंकाळी 6 वाजता लेखी उत्तर सादर केले, मात्र नव्वद दिवसापेक्षा अधिक कालावधी झाल्याने मा. कोर्टाने ते अमान्य केले आणि दिनांक 5 सप्टेंबर 2023 ही पुढील तारीख दिली. मात्र तत्पुर्वीच वेकोलिने गैर कायदेशीररित्या आमच्या मालकिच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करून न्यायालयाची अवमानना केली, असाही आरोप वेकोलीवर शेतकऱ्यांनी लावला. (wcl) (WESTERN COALFIELDS LIMITED)

        या संदर्भात वेकोलिचे बल्लारपुर क्षेत्रीय नियोजन अधिकारी चक्रवर्ती यांनी सांगितले कि, वेकोलिने कोल बेअरिंग ऐक्ट नुसार ही जमीन घेतली आहे. त्यानुुसार कारवाई सुरू आहे, सदर जमिनीचा मोबदला ट्रिब्युनलमध्ये जमा आहे. कारवाईचे वेळी मुख्य महाव्यवस्थापक संचालन विनोदकुमार नामदेव, उपक्षेत्रिय व्यवस्थापक सिंग, पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, मंडल अधिकारी रामटेके मॅडम, तलाठी सुनील रामटेके आणि मोठ्या प्रमाणात पोलिस व महिला पोलिस उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top