Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बळीराजांचे राज्य महाराष्ट्रात येऊ द्या हो....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बीआरएस ची नागपंचमी दिनी सोमेश्वर मंदिरात विशेष पूजा बिल्लू चिलकुलवार यांच्या उपस्थितीत काय सांगितले भूषण फुसे यांनी, बघा व्हिडीओ आमचा विदर्भ...

बीआरएस ची नागपंचमी दिनी सोमेश्वर मंदिरात विशेष पूजा
बिल्लू चिलकुलवार यांच्या उपस्थितीत काय सांगितले भूषण फुसे यांनी, बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २२ ऑगस्ट २०२३) -
        महाराष्ट्र राज्यात तेलंगणा सरकारच्या धर्तीवर शेतकरी कल्याणाचे राज्य स्थापित होऊ दे यासाठी नागपंचमी सणाच्या पर्वावर राजूरा येथील जागृत दैवत सोमेश्वर देवस्थानात भोळ्या शंकराला बीआरएस ने साकडे घातले आणि महाराष्ट्रातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बळीराजा, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येउदे यासाठी हवन करण्यात आले. (Special Puja at Someshwar Temple on Nag Panchami of BRS)

        नागपंचमी सणाच्या पर्वावर बीआरएस नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनेक बीआरएस कार्यकर्त्यांनी राजूरा शहरातील जागृत देवस्थान सोमेश्वर मंदिरात येथील भोळ्या शंकराला साकडे घातले की तेलंगाणा राज्यासारखे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिवर्षं किसान बंधू योजने सारखे शेती खर्चासाठी 10 हजारांची मदत मिळुदे, खरेदी केंद्रावर हमीभावाने खरेदी योजना लागू होऊ दे, शेतीसाठी अखंड पाणी योजनेमार्फत पाणी मिळू दे, प्रत्येक शेतकऱ्यांना जीवन किसान विमा योजना सुरू होऊ दे, आश्रमशाळा व उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना शिक्षणात शासनाची फी प्रतिपूर्ती योजना मिळू दे, दलित कुटुंबांना मूख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना उद्योगात मदतीला 10 लाखांची दलित बंधू योजनांसारख्या योजना महाराष्ट्र राज्यात लागू होऊ द्या यासाठी हवन करण्यात आले. (What Bhushan Phuse said in the presence of Billu Chilkulwar)

        भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे, युवा नेते राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, संघर्ष गडपिल्ली, प्रदीप इरकला,  सागर पारनंदी, सतीश लोनगाडगे, अश्विन वाघमारे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top