Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा तालुक्यातील विहीरगावात रक्तरंजित घटना; कौटुंबिक कलहाचा दुर्दैवी शेवट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुलत भावाच्या हल्ल्यात ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू आमचा विदर्भ वृत्त सेवा राजुरा (दि. ०४ जून २०२६) -         राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे क...
चुलत भावाच्या हल्ल्यात ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
आमचा विदर्भ वृत्त सेवा
राजुरा (दि. ०४ जून २०२६) -
        राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान ३८ वर्षीय तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाने हिंसक रूप धारण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच विरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.

        मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास रविंद्र गुरमेट्टीवार यांचा त्यांच्या चुलत भाऊ नितीन गजानन गुरमेट्टीवार याच्यासोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाला. हा वाद काही वेळातच विकोपाला गेल्यानंतर रविंद्र गुरमेट्टीवार यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर रविंद्र गुरमेट्टीवार हे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापती झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच विरूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

        या प्रकरणात नितीन गजानन गुरमेट्टीवार याला रविंद्र गुरमेट्टीवार यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. विरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणेदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी सचिन थेरे, राहुल वैद्य आणि भगवान पडवाल हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचा घटनाक्रम आणि इतर बाबींचा पोलीसांकडून सखोल तपास सुरू आहे.

#Rajura #RajuraNews #Virur #VirurPolice #Wihirgaon #Chandrapur #ChandrapurNews #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #MurderCase #FamilyDispute #BNS #PoliceInvestigation #LocalNews #VidarbhaNews #राजुरा #विरूर #विहीरगाव #चंद्रपूर #महाराष्ट्र #गुन्हेवार्ता #हत्या #ब्रेकिंगन्यूज #कौटुंबिकवाद #पोलीसतपास #स्थानिकबातम्या

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top