Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा विधानसभा क्षेत्रात भारत राष्ट्र समिती ची आढावा बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुरूवात पासून तालुका समन्वयक म्हणून काम करीत पक्ष वाढवत आहे त्यांना त्याच पदावर ठेवण्याचा निर्णय आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि....

सुरूवात पासून तालुका समन्वयक म्हणून काम करीत पक्ष वाढवत आहे त्यांना त्याच पदावर ठेवण्याचा निर्णय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १३ ऑगस्ट २०२३) -
        स्थानिक विश्रामगृहात भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) ची आढावा बैठक राजुरा विधानसभा समन्वयक आनंदराव अंगलवार (Anandrao Angalwar), राजुरा विधानसभा महिला समन्वयक रेशमा चव्हाण (Reshma Chavan), राजुरा विधानसभा सहसमन्वय ॲड संतोष कुळमेथे (Adv Santosh Kulmethe) यांच्या उपस्थितीत शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करत ठराव घेण्यात आले त्यात प्रामुख्याने......
राजुरा विधानसभा मध्ये फिरत असताना तालुका समन्वयक किंवा स्थानिक कार्यकर्ते यांना सूचना वा विश्वासात घेऊन वरिष्ठ पदाधिकारी ह्यांनी तालुक्यात पक्ष बांधणी किंवा कार्यक्रम घ्यावे. असे झाले होत नसेल तर तालुका समन्वयक किंवा स्थानिक पदाधिकारी लेखी तक्रार विधानसभा अध्यक्ष ह्यांच्या कडे देण्यात यावे.
  • सुरुवातीपासून जे तालुका समन्वयक म्हणून काम करीत पक्ष वाढवत आहे त्यांना भविष्यात त्याच पदावर ठेवण्याचा निर्णय. 
  • जिवती तालुक्यात तालुकास्तरीय मोठी सभा आयोजित करण्यात करण्याचा निर्णय. 
  • सर्व तालुका समन्वयक याना गाव तिथं शाखा सुरू करून प्रत्येक गावाचा एक शाखा प्रमुख, त्याचे नाव, नंबर ,व फोटो अशी यादी करून विधानसभा समन्वयक ह्यांच्या कडे सुपूर्द करण्याची जबाबदारी. 
  • सर्व तालुका समन्वयक ह्यांनी तालुक्यात कमीत कमी आठवड्यात एक बैठक घेण्याचा निर्णय. 
  • येणाऱ्या आर्वी, रामपुर, सास्ती ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा निर्णय. 
असे विविध ठराव मंजूर करण्यात आले. बैठकीत राजुरा तालुका समन्वयक अजय साकीनाला, ओबीसी तालुका समन्वयक लखन अडबायले, अल्पसंख्यांक तालुका समन्वयक शेख रियाज, एसटी तालुका समन्वयक शंकर आत्राम, कोरपना तालुका समन्वयक अरूण पेचे, ओबीसी कोरपना तालुका समन्वयक सुधीर खनके, एसटी कोरपना तालुका समन्वयक रमेश कुळसंगे, जिवती तालुका समन्वयक बालाजी करले, किसान जिवती तालुका समन्वयक विजय राठोड, एसटी जिवती तालुका समन्वयक बालाजी आत्राम, गोंडपिपरी तालुका समन्वयक जिवनदास चौधरी, गोंडपिपरी शहर समन्वयक सुनील साक्कलवार, एससी गोंडपिपरी तालुका समन्वयक संदीप उराडे, सोबतच सास्ती शहर सह समन्वयक विजय जुलमे, राजुरा महिला तालुका समन्वयक ज्योतीताई नळे, एससी तालुका महिला समन्वयक अश्विनीताई उपरे, एसटी राजुरा तालुका समन्वयक सीमाताई कूळमेथे, जिवती तालुका महीला समन्वयक कविता राठोड, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक सारिका पच्छुर, राजुरा विधानसभा सोशल मीडिया समन्वयक प्रवीण मेकट्टीवार, राजुरा विधानसभा महिला सदस्या अनुसूर्या नुती, मीनाताई जुलमे,राजुरा शहर समन्वयक प्रदीप पोपटे, राजुरा शहर महिला समन्वयक रेखा टोक्कलवार, राजुरा तालुका युवा समन्वयक प्रशांत गद्दम, बाबाराव मस्की, भूषण फुसे, शोभा मस्की, मीनाक्षी मून, राकेश चीलकुल्वार, सन्नी रेड्डी, राजू काटक, बाबू भाई, महेंद्र ठाकूर, आकाश गेडाम, नागोराव झाडे, सतीश बिटला, वेणू भाई,शेखर पोइंकर, विनोद चीताडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (Working as taluka coordinator from the beginning, the party is growing and decided to keep him in the same position) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top