Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जनता माझ्यासाठी ईश्वराचे रूप असून त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा येथे सेवा केंद्र व भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा भाजपाच्या पाचव्या कार्यालयाने राजुरा विधानसभेत "मतभेदांची एंट्री&quo...
राजुरा येथे सेवा केंद्र व भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा
भाजपाच्या पाचव्या कार्यालयाने राजुरा विधानसभेत "मतभेदांची एंट्री"
भाजपच्या एका गटाने फिरविली पाठ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १३ ऑगस्ट २०२३) -
        भाजपाचे कार्यकर्ते हे जनतेचे हित समोर ठेवून समाजकार्याचा संकल्प करीत असतात, जनता ही माझ्यासाठी ईश्वराचे रूप असून त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. जनता जसा जो देईल तो स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. कार्यकर्त्यांनी लवकर उन्मादात येऊ नये किंवा हताश होऊ नये. राजुरा येथे सुरू करण्यात येणाऱ्या सेवा केंद्रातून गोरगरीब जनतेची सेवा या केंद्राच्या माध्यमातून होणार असून शासकीय योजनांची माहिती व मदत सेवा पुरविली जाईल. मूर्ती विमानतळाच्या बाबतीत वाघ अडचणीत येईल म्हणून मी पाठविलेल्या अहवालावर माजी मुख्यमंत्र्यांनी नकारात्मकता दर्शविल्यामुळे मूर्ती विमानतळाचा प्रश्न अडविला गेल्या आहे. पण आम्ही तो प्रश्न लावू असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. (Sudhir Mungantiwar) (Inauguration ceremony of Seva Kendra and BJP Public Relations Office at Rajura)
 
        यावेळी देवराव भोंगळे (Devrao Bhongle) यांनी बोलताना सांगितले की, राजुरा तालुक्यातील जनतेसाठी सुधीर मुनगंटीवर सेवा केंद्र नेहमी मदतीसाठी सुरू राहील यामध्यामातून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. तर माजी आमदार निमकर यांनी सांगितले की सुधीर  मुनगंटीवार यांच्या माध्यमातून राजुरा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे होत असून यानंतर सुद्धा विकासाची गंगा वाहणार असल्याचे सांगितले. ("Entry of Differences" in Rajura Legislative Assembly by BJP's Fifth Office)

        यावेळी मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा (Harish Sharma), माजी आमदार सुदर्शन निमकर, देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे आशिष देवतळे, महिला जिल्हा अध्यक्ष अल्काताई आत्राम, चंद्रपूर लोकसभा विस्तारक प्रमोद कडू, नामदेव डाहुले, अमर बोडलावार, अरुण मस्की, नारायण हिवरकर, विवेक बोढे, महेश देवकते, विजयालक्ष्मी डोहे, सुलोचना गुरनुले, अमृता पिलेवाड, सुरेखा श्रीकोंडावार, सुलभा पिपरे, वाघूजी गेडाम, सिद्धार्थ पथाडे, विनायक बोनगिरवार, तालुकाध्यक्ष सुनिल उरकूडे, बबन निकोडे, सुनंदा डोंगे, भाजपा नेते सतीश उपलंचीवर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार केतन जूनघरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

मंचा जवळ कार्यकर्त्यांनी केली होती प्रचंड गर्दी 
        बाहेरचा नेता राजुरा शहरात जनसंपर्क कार्यालयाला हजारोच्या संख्येने जनसमुदाय गोळा करण्याचे कसब देवराव भोंगळे यांना करता आले ही बाब भाजपा मध्ये हलचल निर्माण करणारी आहे. कार्यक्रमात आलेले नागरिक दूरदूरवरून आले होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत करीत असताना अचानक वाढलेल्या गर्दीने तेथे उपस्थित एका बाहेरच्या कार्यकर्त्याने मग्रुरीने नागरिकांना व महिलाना खाली बसा किंवा मागे व्हा म्हटल्याने हि बाब काहींना खटकली व त्यांनी कार्यक्रम सोडून घरी जाणे पसंत केले. 

भाजपाच्या सेवा केंद्र कार्यालयाने भाजपमध्येच राजुरा विधानसभेत "मतभेदांची एंट्री"
        राजुरा विधानसभा प्रमुख तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या द्वारे आयोजित भाजपा जनसंपर्क कार्यालय व सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय ओबीसी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खुशाल बोंडे, माजी आमदार अँड. संजय धोटे, त्यांचे बंधू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, त्यांचे निकटवर्तीय भाजयुमोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, निलेश ताजने, आशिष ताजने यांचे सह वर्षानुवर्षे भाजपच्या पाठीशी राहणाऱ्या कट्टर भाजपा कार्यकर्त्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविली होती.  नागरिकांमध्ये याविषयी उलटसुलट जोरदार चर्चा रंगू लागली आहे. बाहेरचा नेता राजुरा शहरात जनसंपर्क कार्यालय उघडतोय व पक्षातीलच श्रेष्ठी बाहेरच्या व्यक्तीला थोपवत असल्याची बाब भाजपा मध्ये हलचल निर्माण करणारी आहे. येणाऱ्या काळात याचे पाडसात आता उघड्पणेच दिसू लागणार आहे अशी चर्चा विधानसभा क्षेत्रात सर्वत्र सुरु आहे. ("Entry of differences" in Rajura Legislative Assembly by BJP's Seva Kendra Office) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top