Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सास्ती-राजुरा मार्गावर भीषण अपघात - तीन ठार, दोन जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अज्ञात वाहनाची दोन दुचाकीद्वारांना धडक आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १३ ऑगस्ट २०२३) -         आज सायंकाळी ७.४५ वाजताच्या दरम्य...

अज्ञात वाहनाची दोन दुचाकीद्वारांना धडक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १३ ऑगस्ट २०२३) -
        आज सायंकाळी ७.४५ वाजताच्या दरम्यान सास्ती - राजुरा मार्गावर भीषण अपघात झाला असून एका अज्ञात वाहनाने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने एका दुचाकीवरील पती-पत्नी व एक मुलं जागीच ठार तर थोड्या अंतरानंतर पुन्हा एका दुचाकीला धडक दिल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून संतापलेल्या लोकांनी वाहतूक अडवून ठेवली आहे. (An unknown vehicle collided with two bikes)

        मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात वाहनाने धोपटाला टाऊनशिप गेट जवळ एका दुचाकी वाहनाला धडक दिली त्यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. अज्ञात वाहनाने तिथून पळ काढला व थोड्या समोर जाऊन धोपटाला गावाजवळील जव्हेरी पेट्रोल पंपाजवळ पुन्हा एका दुचाकी ला जबर धडक दिली या धडकेत एक महिला, पुरुष व अंदाजे २-3 वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. संतापलेल्या लोकांनी वाहतूक अडवून ठेवली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. समोरील तपास पोलीस करीत आहे. (rajura) (aamcha vidarbha)

(सविस्तर माहिती थोड्याच वेळात)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top