Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात देशी प्रजातीची अमृत वाटिका तयार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. १४ ऑगस्ट २०२३) -         राष्ट्रीय सेवा योजना पथक व वनस्पतीशास्त्र विभाग श्री शिवाजी कला, वाणिज...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. १४ ऑगस्ट २०२३) -
        राष्ट्रीय सेवा योजना पथक व वनस्पतीशास्त्र विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात १५ देशी प्रजातीची ७५ झाडे लावून अमृत वाटीका तयार करण्यात आली, या देशी प्रजातीमधे भोकर, जाम, पांगडा, पिपल, कदम, जरूड, जामून, निम, बेल, शिशू, आंजन, शेमल, कवठ, बांबू असे झाडे लावण्यात आली. ही झाडे सामाजिक वनीकरण विभाग जिल्हा चंद्रपूर या उपलब्ध करून देण्यात आली. फक्त वृक्ष लावून न थांबता ते कायमस्वरूपी जगविण्यासाठी ही लावलेली झाडे संगोपनासाठी प्राध्यापक व मुलांना दत्तक  देण्यात आली. महाविद्यालयात प्रवेशीत मुलांनी आपापल्या गावावरून  झाडे लावण्याकरीता माती आणि ही माती झाडे लावण्याकरिता वापरण्यात आली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर. आर. खेराणी, आयक्यूएसी चे समन्वयक डॉ मल्लेश रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय राजुरा चे कर्मचारी व सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक तथा अन्य विद्यार्थी उपस्थित होते. (Shri Shivaji College of Arts, Commerce and Science Rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top