Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्थानीय गुन्हे शाखेची नांदा फाटा येथील सट्टा पट्टीवर धाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाच आरोपींवर गुन्हा दाखल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गडचांदूर (दि. १२ ऑगस्ट २०२३) -         नांदा फाटा पासून पिंपळगाव जाणाऱ्या शेतशिवारात...

पाच आरोपींवर गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचांदूर (दि. १२ ऑगस्ट २०२३) -
        नांदा फाटा पासून पिंपळगाव जाणाऱ्या शेतशिवारात लोकांकडून पैशे घेऊन कमी पैशात जास्त पैशाची आमिष दाखवून सट्टा पट्टी सुरु असल्याची माहिती स्थानीय गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक संतोषसिंह परदेशी यांच्या आदेशावरून स्थानीय गुन्हे शाखेचे महेश कोंडावार यांच्या टीमने धाड टाकली. या धाडीत झडती मध्ये पोलिसांनी मोबाईल सकट ८८ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपी राजू ठाकरे वय ३५ रा. नांदा फाटा, सुनील बेले वय ४४ रा. नांदा फाटा, साडवली नुरशेट्टी वय ४२ रा. नांदा फाटा, किशोर सुराणा वय ४७ रा. नांदा फाटा, तोशिफ रा. चंद्रपूर याना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध भादंवि १०९, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Nanda Fata) (LCB) सदरची कारवाई स्थानीय गुन्हे शाखेचे महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पो.ह. सुरेंद्र बन्सोड, दीपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे यांनी केली. (aamcha vidarbha) (A case has been registered against five accused)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top