Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: CTPS कामगारांच्या मागण्यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याची ताकीद!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कामगार आयुक्ताकडून कल्याण अधिकाऱ्याला सूचना महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेने दिलेल्या साखळी उपोषणच्या इशाराला यश आमचा...

कामगार आयुक्ताकडून कल्याण अधिकाऱ्याला सूचना
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेने दिलेल्या साखळी उपोषणच्या इशाराला यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपुर (दि. १२ ऑगस्ट २०२३) -
        येथील सि.टी.पी.एस. मध्ये गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचे शोषण केले जात असून अनुक्रमे 1 ते 25 कामगारांच्या मागण्यासंदर्भात निवेदन देवून मागण्या मान्य न झाल्यास दि.10 ऑगस्त 2023 पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिल्याने चंद्रपुर कामगार आयुक्त मड़ावी यांनी सदर बाबींची दखल घेत आपल्या कार्यालयात सि.टी.पी.एस.चे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपुर शिवसेना सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे, संस्थापक सचिव तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, यूनिट अध्यक्ष संतोष ढोक व यूनिट पदाधिकारी यांच्यात बैठक घेवून सि.टी.पी.एस.चे कल्याण अधिकारी वंजारी यांना सि.टी.पी.एस. कामगारांच्या मागण्यासंदर्भात वरिष्ठामार्फत परवानगी मिळवुन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देवून उर्वरित मागण्या सि.टी.पी.एस. कार्यालयात सोडवण्यात येण्याचे निर्देश देण्यात आले. (Notice from Labor Commissioner to Welfare Officer)

        सि.टी.पी.एस.मध्ये सर्व कंत्राटदार व अधिकारी अनेक वर्षापासून जवळपास अर्ध्या कामगारांकडून कामे करुन घेवून आर्थिक स्वार्थ साधणे, स्थानिकांना कंत्राट व रोजगार न देता बाहेरील लोकांना प्राधान्य देवून करोडोचे कंत्राट ज्याला त्यालाच इन्क्वायरीमार्फत आर्थिक स्वार्थ साधणे, कामगाराचा मृत्यु वारसाला झाल्यास 20 लाखाची आर्थिक मदत, सि.एस.आर. फंडातून 5 लाख, निवृती झाल्यावर 10 लाख  व पाल्यास नौकरी, किमान वेतन नुसार पगार, पि. एफ. नियमित भरणे, ई. एस. आय. सर्व कामगारांना देणे, फौजदारी गुन्हे दाखल कंत्राटदार कामे देण्यात येवू नये, कंत्राटदार कामे करण्यात वाढिव मुदत देवू नये, 12 ते 15 वर्षापासून अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात याव्यात, कामगार जॉब सिक्योरिटी देण्यात यावी, ज्याठिकाणी काम आहे त्याजागेवरुन इतरत्र कामे करण्यास बळजबरी करणे, कामगार सांस्कृतिक सभागृह व मुलांना शैक्षणिक मेळावे, मोटरसायकल व मोबाइल बंदी करू नये, सकाळी कामावर जाताना गर्दीबाबत उपाय योजना अशा अनेक कंत्राटी कामगारांच्या समस्याबद्दल सविस्तर चर्चा करुन कामगार आयुक्त यांच्या कडून त्यांच्यामार्फत व सि. टी. पी. एस. कल्याण अधिकारी यांनी आपल्या कार्यालय बाकी मागण्या तात्काळ मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपुर शिवसेना सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे, संस्थापक सचिव तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, यूनिट अध्यक्ष संतोष ढोक, उपाध्यक्ष जगदीश सहारे, सचिव आशिष गोमासे, सहसचिव वैभव सोनकुसरे,राजू रायपुरे व कामगार  उपस्थित होते. (Maharashtra State Security Guards and Contract Workers Sena's warning of a chain hunger strike was a success) (chandrapur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top