Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने राजुरा-देवाळा-गडचांदूर मार्गाने बस सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
येरगव्हानवाशीयांनी मानले आमदारांचे आभार आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १२ ऑगस्ट २०२३) -         राजुरा तालुक्यातील मौजा येरगव्ह...

येरगव्हानवाशीयांनी मानले आमदारांचे आभार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १२ ऑगस्ट २०२३) -
        राजुरा तालुक्यातील मौजा येरगव्हान गावातील शालेय विद्यार्थी, नागरिक यांनी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस येत नसल्याने गावातील विद्यार्थी व नागरीकांना होणारा त्रास, त्यामुळे येणाऱ्या अडचणी आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांची भेट घेऊन सांगितल्या. या सर्वाची दखल घेऊन त्यांनी राजुरा आगाराच्या व्यवस्थापकांना यासंदर्भात विशेष लक्ष देऊन या भागात राजुरा - देवाळा - गडचांदूर अशी राज्य परिवहन महामंडळाची बस सुरु करण्यात यावी असे निर्देश दिले. अखेर आगार व्यवस्थापकांनी तातडीने दखल घेऊन या मार्गाने बस सुरू केली. ST bus

        राजुरा - देवाळा - गडचांदूर मार्गवर आता नियमितपणे सकाळी गडचांदूर ते राजुरा आणि सायंकाळी राजुरा ते गडचांदूर अशा दोन फेऱ्या ही बस मारीत असून या भागातील शालेय विद्यार्थी, नागरिकांनी आपल्या विनंतीची दखल घेऊन बस सुरू केल्यामुळे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहेत. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top