Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 13 ऑगस्ट ला जिल्हास्तरीय धनगर जमात मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे चंद्रपूर (दि. ११ ऑगस्ट २०२३) -...

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
चंद्रपूर (दि. ११ ऑगस्ट २०२३) -
        स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे दि 13 ऑगस्ट रोजी धनगर जमात सेवा मंडल जिल्हा चंद्रपूर तर्फे जिल्हास्तरीय धनगर जमातीचे प्रबोधन मेळावा व गुणवंत विद्यार्थी तसेच अन्यक्षेत्रातील विविध प्रतिभाषाली व्यक्तींचे यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. धनगर आरक्षण लढाई बद्दल प्रबोधन तसेच धनगर जमातीतील विविध गंभीर समस्या व मुद्द्यांचे विचार मंथन या सोहळ्यामध्ये होणार आहे तसेच दहावी, बारावी, विद्यापीठ स्तरीय, सरपंच अन्य सदस्य व अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिभाषाली कार्य करणारे व्यक्तिमत्व यांचा सत्कार होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री, वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे उपस्थित राहणार आहे तसेच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. (Dr. Mangesh Gulwade)

        डॉ मंगेश गुलवाडे, जिल्हा अध्यक्ष धनगर जमात सेवा मंडळ चंद्रपूर व प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री श्याम वाकर्डे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प चंद्रपूर राहणार आहेत. या जिल्हास्तरीय प्रबोध मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व धनगर जमात बंधू-भगिनी, युवा, नागरिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन धनगर जमात सेवा मंडळ, जिल्हा चंद्रपूर तसेच धनगर जमात युवक युवती मंच, महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच, राजमाता अहिल्यादेवी महिला मंडळ, जय मल्हार जेष्ठ नागरिक संघ, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा चंद्रपूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे. सदर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेत जिल्हातील सुप्रसिद्ध ईएनटी सर्जन डाॅ. मंगेश गुलवाडे,  गणपतराव येवले, कैलास घोरुडे, वामन मंदे, प्रवीण गिलबिले, मयूर भोकरे, प्रज्वल गिलबिले उपस्थित होते. (chandrapur) (aamcha vidarbha) (The presence of Guardian Minister Sudhir Mungantiwar and Legislative Council Member Gopichand Padalkar)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top