गढ़चांदुर (दि. ११ ऑगस्ट २०२३) -
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत नांदा येथे दि. 9 ऑगस्ट 2023 ला आदिवासी मूळनिवासी जागतिक दिन साजरा करण्यात आला. बिरसा क्रांती आदिवासी युवा मंडळ नांदा यांच्या सौजन्याने कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी ग्राम पंचायत कार्यालय समोरील सल्लाशक्ती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सौ. मेघा नरेश पेन्दोर सरपंच नांदा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात नांदा सोबतच राजुरगुडा, लालगुडा येथील सर्व आदिवासी बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते. पारंपरिक नृत्य व ढोल वाद्यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष तथा संस्थापक यांनी प्रास्ताविक करून आदिवासी समाजाला जागतिक दिनाची माहिती सांगितली व एकत्रित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघा नरेश पेन्दोर, माजी सरपंच सौ. पुजा मडावी, किशोर मडावी, किसन कोरांगे, नामदेव तोडासे, रामचंद्र सायकाटे, श्यामदेव आत्राम, गंगाधर मेश्राम, प्रवीण कुरसंगे, देवानंद आत्राम, महादेव कुंमरे, अशोक मडावी, सविन मडावी, प्रभाकर मडावी, राहुल टेकाम, नथू मडावी, रामचंद्र कुडापे, महादेव आत्राम, कैलास वाघाडे सर, उत्तम आत्राम, गुरुदेव तिरणकर, संतोष मडावी, पुरुषोत्तम मडावी, देवा मडावी, मोतीलाल मडावी, नामदेव मंडळी, गुलाब मडावी, देवराव मडावी साहित गावातील अनेक महिला पुरुष कार्यक्रमासाठी उपस्थिती होत्या. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.