Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सह्याद्री अतिथी गृहात घेतली तीनही विभागाची पूर्व तयारी  बैठक वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्या...

सह्याद्री अतिथी गृहात घेतली तीनही विभागाची पूर्व तयारी  बैठक
वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे 
मुंबई (दि. १५ जुलै २०२३) -
        राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी मुद्देसूद चर्चा करुन त्यांना न्याय देण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधिमंडळ अधिवेशन 
(Legislative session) महत्वाचे असून मागील अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन करुन, अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwa) यांनी आज केले.

        १७ जुलै पासून सुरू होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर वने,सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय या तीनही विभागातील कामांसंदर्भात  आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती, सर्व तारांकित प्रश्न, लक्षवेधी, पुढील संकल्प यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे अधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक घेतली. तीनही विभागांचे सचिव व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. (Mumbai)

        ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तीनही विभागाचे सादरीकरण बघून विषयनिहाय मुद्देसुद चर्चा केली. सांस्कृतिक कार्य विभागाने वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांची माहीती घेऊन विभागाने यासंदर्भात माहीती पुस्तिका प्रकाशित करण्याची  सूचना केली. प्रधान सचिव श्री विकास खारगे यांनी सादरीकरण केले. वन विभागाच्या विविध योजना, नुकसान भरपाई, वन्यजीव संवर्धन आणि सामाजिक वनीकरण याबाबत प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी यांनी सादरीकरण केले. 

        मत्स्य व्यवसाय विभागाच्या बैठकीत प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सविस्तर सादरीकरण केले. मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना, जाहीर करण्यात आलेले अनुदान, डिझेल परतावा, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, केंद्रातील योजनांची अंमलबजावणी, ससून डॉक विकास इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा करुन आवश्यक सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top