Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रुग्ण सेवेतील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन तातडीने करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सुचना आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १५ जुलै २०२३) -         राजुरा उपजिल्हा रुग्...

आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सुचना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १५ जुलै २०२३) -
        राजुरा उपजिल्हा रुग्णालय तसेच राज्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना सेवा पुरविणे यासाठी तात्पुरत्या स्वरुपात अल्प कालावधीकरिता कुशल व अकुशल कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करून रुग्ण सेवा देण्याचे काम सुरु आहे. मात्र गेली ३ ते ४ महिन्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार, मानधन न मिळाल्याने रुग्ण सेवेचे महत्त्वाचे काम करणाऱ्या या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर गंभीर समस्या घेऊन अनेक कंत्राटी कामगार आ. सुभाष धोटे (Subhash Dhote) यांना भेटून पगाराबाबतची परिस्थिती निवेदनाद्वारे लक्षात आणून दिली. सदर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोले यांना फोन करून तातडीने कंत्राटी कामगारांचे वेतन करावे अशा सूचना दिल्या. (Rajura Upazila Hospital) (Pay contract workers)

        उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे तात्पुरत्या स्वरुपात अल्प कालावधीकरिता कुशल व अकुशल कंत्राटी पदाकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम Accuree services Priv-limited Aurangabad या संस्थेकडे असून संस्थेने राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे अधिपरिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, बाह्य रुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, शस्त्र क्रिया गृह परिचर, व्रनोपचाराक, कक्षसेवक हि पडे पुरवठा केलेली आहेत. मागील सहा महिन्यापासुन कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. माहे एप्रिल ते जून २०२३ या 'कालावधीतील वेतन प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही कर्मचारी घरचे कुटुंब प्रमुख असल्याने मुलांच्या शैक्षणिक कामाकरिता व इतर आर्थिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे प्रलंबित वेतन सर्वांना अदा करून येणाऱ्या काळात सर्व कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची व्यवस्था करावी अशा सुचना आ. धोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना केल्या आहेत. (Rajura) (Aamcha Vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top