Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रकल्पग्रस्त व 12 दत्तक गावातील बेरोजगारांना डावलुन अंबुजा सीमेंट उपरवाही मध्ये नौकर भरती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाहीचे महासचिव राजेंद्र लोनगाडगे यांनी दिले निवेदन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 15...

अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाहीचे महासचिव राजेंद्र लोनगाडगे यांनी दिले निवेदन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 15 जुलै 2023) -
        सन 2012 पासुन अंबुजा प्रकल्पग्रस्त व 12 दत्तक गावातील बेरोजगारांना डावलुन पॅकिंग प्लांट मध्ये लोडर, पॅकर आपरेटर व सीलिंग मध्ये संबंधित ठेकेदार, सुपरवाइजर, युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्या संगम मताने प्रकल्पग्रस्त व 12 दत्तक गावातील बेरोजगार असल्याचे दाखवुन 44 बाहेरील लोकांना नौकरीवर घेण्यात आले. एक महिन्यापूर्वी माईंन्स डिपार्टमेंट मध्ये प्रकल्पग्रस्तांना डावलुन व ग्रामपंचायतला मुलाखतीचा नोटिस न लावता नुकत्याच ड्राइवरच्या 7 जागा घेण्यात आल्या. त्यात पुगलिया काॅंग्रेसचे 4 व वडेट्टीवार काॅंग्रेसचे 3 ड्राइवर घेण्यात आले. हा तर प्रकल्पग्रस्तावर  अन्याय असल्याचा आरोप अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाहीचे महासचिव राजेंद्र लोनगाडगे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) वने, सांस्कृतिक व मत्सव्यसाय मंत्री महाराष्ट्र राज्य सरकार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. (Ambuja Cement Mazdoor Union) (gadchandur)

        यावर्षी केलेल्या अस्थाई लोडर व सीलिंग भरती मध्ये पुगलिया काॅंग्रेसचे 13 कामगार व वडेट्टीवार काॅंग्रेसचे 10 कामगार घेण्यात आले. सन 2001 पासुन कंपनी चालु झाली. सुरवातीला शेतकरी संघटनचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या सिफारिशने शेतकरी संघटनेच्या लोकांना नौक-या देण्यात आल्या नंतर काॅंग्रेसचे तत्कालीन आमदार सुदर्शन निमकर यांच्या सिफारिशने काॅंग्रेसच्या लोकांना नौक-या देण्यात आल्या. सन 2007 पासुन आज पर्यंत काॅंग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या युनियनच्या माध्यमातुन काॅंग्रेसच्या लोकांना 120 वेजबोर्ड कर्मचारी व शेकडो ठेकेदारी कामगारांना नौकरीवर घेण्यात आले. परंतु सन 2014 पासुन राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. पंरतु एकाही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कंपनीने नौकरी दिलेली नाही. हा तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर अन्याय आहे. हे सगळे विषय घेवुन ना. सुधीर मुनगंटीवार वने सांस्कृतिक व मत्सव्यसाय मंत्री महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या सोबत चर्चा केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवुन दिनांक 12/07/2023 ला संध्याकाळी 05.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. विनय गौड़ा जिल्हाधिकारी महोदया सोबत तात्काळ मिटींग लावण्यात आली. राजेंद्र लोनगाडगे महासचिव अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाही यांनी सगळे विषय जिल्हाधिकारी महोदया समोर मांडले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवुन सहाय्यक कामगार आयुक्त (केंद्रीय) चंद्रपुर व SDO राजुरा यांना आदेश देऊन लवकरात लवकर मिटींग लावण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री महोदयाचे OSD इंगोले, OSD अतकारे, PA महादानी, राजेंद्र लोनगाडगे महासचिव अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाही, यशवंत धांडे कार्याध्यक्ष अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाही, मनोहर कुळसंगे महासचिव भारतीय जनता पार्टी कोरपना, रामकृष्ण मुसळे जेष्ठ भाजपा कार्यकर्ता, गंगाधर शतपलवार प्रसिध्दी प्रमुख अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाही, मनोज मोडक कार्यकारिणी सदस्य अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाही, धनराज पधंरे जेष्ठ भाजपा कार्यकर्ता व प्रकल्पग्रस्त शेतकरी, 12 दत्तक गावातील बेरोजगार मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top