Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मोकाट जनावरे बस स्थानका समोर रात्री मुक्कामास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाहतुकीस होतोय अडथळा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे कोरपना (दि. १२ जुलै २०२३) -         चंद्रपूर, वणी, आदिलाबाद महामार्गावरील कोरपना येथील ...

वाहतुकीस होतोय अडथळा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
कोरपना (दि. १२ जुलै २०२३) -
        चंद्रपूर, वणी, आदिलाबाद महामार्गावरील कोरपना येथील बस स्टॅन्ड येथील चौकात रोज सकाळी व संध्याकाळी मोकाट गुरांचा कळप रस्त्यावर मध्यभागी बसून राहत असल्याने अपघात होत असून वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. या जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून शेतकऱ्यांना सुद्धा या जनावरामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या मोकाट जनावरांवर स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने  नगर पंचायती काहीही कारवाई करत नसून याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (korpana) (Traffic is obstructe)

        नगरपंचायत प्रशासनाने मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची जाहीर दवंडी देऊन जनावर मालकाला दंड आकारावा तरीही पशुपालक जुमानत नसेल तर पशुपालकांवरही कारवाई करावी मागणी काँग्रेस पक्षाचे कोरपना उपाध्यक्ष मोबीन बेग याने केली आहे. (aamcha vidarbha) 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top