Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना तालुक्यातील कोतवाल संजय कुळमेथे याना लाचमागणी प्रकरणात अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
BREAKING NEWS कोरपना तालुक्यातील कोतवाल संजय कुळमेथे याना लाचमागणी प्रकरणात अटक आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२३) ...

BREAKING NEWS
कोरपना तालुक्यातील कोतवाल संजय कुळमेथे याना लाचमागणी प्रकरणात अटक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२३) -
        भोगवटदार वर्ग-२ मध्ये असलेल्या शेतजमीनी भोगवटदार वर्ग-१ मध्ये करून देण्याच्या कामाकरीता वरिष्ठांच्या नावाने कुळमेथे, कोतवाल यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज दि. १२ जुलै २०२३ रोजी पो.स्टे. कोरपना येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. (korpana) (Corruption)

        मिळालेल्या माहितीनुसार मौजा कोरपणा येथील तक्रारदार यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे भोगवटदार वर्ग-२ मध्ये असलेल्या शेतजमीनी भोगवटदार वर्ग-१ मध्ये करून देण्याच्या कामाकरीता वरिष्ठांच्या नावाने कोतवाल संजय कुळमेथे यांनी तक्रारदार यांचेकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची कुळमेथे यांना लाच म्हणून दोन हजार रुपये लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने कुळमेथे यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली. (Kotwal)

        तक्रारीवरून दिनांक ११ जुलै २०२३ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान कोरपना तालुक्यातील साजा पारडी येथील कोतवाल संजय बापुराव कुळमेथे यांनी तक्रारदार यांना वरिष्ठांच्या नावाने  दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज दि. १२ जुलै २०२३ रोजी पोलीस स्टेशन कोरपना येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही पोलिसांनी केली. 

        सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, पो.नि. जितेंद्र गुरनुले तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, संदेश वाघमारे व चापोकॉ सतिश सिडाम यांनी केली. (Anti Corruption Department Office Nagpur)

          सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर पोलीस अधीक्षक, राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय नागपुर यांनी केले आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top