Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नेत्रतज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२३) -         चंद्रपूर शहरातील नेत्रतज्ञ यांचा मृतदेह त्यांच्...

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२३) -
        चंद्रपूर शहरातील नेत्रतज्ञ यांचा मृतदेह त्यांच्याच खाजगी रुग्णालयात आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली असून मृत्यूचे नेमकं कारण अजून स्पष्ट झाले नाही. (chandrapur)

        शहरातील जयंत टॉकीज परिसरातील चर्च समोर असलेल्या साई आय हॉस्पिटल चे डॉ. उमेश अग्रवाल (Dr Umesh Agarwal) यांचा मृतदेह दिनांक 11 जुलै रोजी संध्याकाळी त्यांच्याच रुग्णालयात आढळला. याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीसांना दिली, पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

        मंगळवारी जवळपास सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत डॉ. अग्रवाल यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर आपल्या केबिन मध्ये आराम करतो, कुणीही उठवू नये असे दवाखान्यामधील कर्मचाऱ्यांना सांगून आपल्या कॅबिन मध्ये झोपले दरम्यान बऱ्याच वेळ हालचाल न दिसल्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला असता डॉक्टर मृतावस्थेत आढळले.

        त्यांच्या पत्नीही डॉक्टर असून प्रसिध्द दंतरोग तज्ञ Dentist आहेत तर मुलगा अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांच्या खळबळजनक मृत्यूमुळे चंद्रपूरसह इतरही जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top