Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पाणलोट सचिवांचे मानधन तातडीने द्या - शिवसेना तालुकाप्रमुख भरत बिरादार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कृषी विभागाच्या हलगर्जीमुळे पाणलोट सचिवांचे तब्बल एप्रिल-जुलै चे मानधन रखडले आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे जिवती (दि. ११ जुलै २०२३) -     ...

कृषी विभागाच्या हलगर्जीमुळे पाणलोट सचिवांचे तब्बल एप्रिल-जुलै चे मानधन रखडले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
जिवती (दि. ११ जुलै २०२३) -
        जिवती तालुक्यात मृद व जलसंधारण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सचिवांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र मार्च ते जुलै  अखेरपर्यंत मानधन न मिळाल्याने या सचिवांवर सहकुटुंब उपासमारीची वेळ आली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्थात पाणलोट क्षेत्र विकास या केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमांतर्गत मृद व जलसंधारण कार्यक्रम राबवणे, मत्ता नसलेल्या व्यक्तींसाठी उपजीविका साधन सामुग्री निर्माण करणे, प्रशिक्षण, सुक्ष्म उद्योजकता तसेच उत्पादन पद्धतीवर आधारित उपजीविका उपक्रम अहवाल तयार करणे आदी कार्यक्रमांची जबाबदारी या सचिवांवर सोपविण्यात आली होती, परंतु अगदी डोंगरदऱ्यांत कंबर मोडेस्तोवर काम करूनही पदरी काहीच दिडकी न पडल्याने या सचिवांवर सहकुटुंब उपासमारीची वेळ आली आहे. (Shivsena) (Soil and Water Conservation Programme) (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana) (Due to the laxity of the Agriculture Department, the salary of the watershed secretary was stopped for almost April-July)

        याबाबत वारंवार (Taluka Agriculture Officer) तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी करण्यासाठी हेलपाटे मारूनही हे अधिकारी ताकास तूर लागू देत नसल्याचे सचिवांकडून बोलले जात आहे. या योजनेला गती देण्यासाठी गावपातळीवर किमान तीन हजार रुपये इतक्या अत्यल्प मानधनावर सचिवांची नेमणूक करण्यात आली होती. या योजनेला सचिवांमुळे गती मिळाली, परंतु मानधनाअभावी सचिवांची कुटुंबांचे हाल होत असल्याची भावना सचिवांनी व्यक्त केली. यासाठी पाणलोट सचिवांना तत्काळ मानधन द्यावे याकरिता तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार (Bharat Biradar), तालुका संघटक गणेश पवार, प्रफुल चव्हाण, तेलंगे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. (Jiwati) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top