Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांकरीता समपूदेशन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वतःची किंमत करायला शिका - डॉ. महेश पाचकवडे आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे चंद्रपूर (दि. 11 जुलै 2023) -         श्री शिवाजी कला, वाणिज्य...

स्वतःची किंमत करायला शिका - डॉ. महेश पाचकवडे
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
चंद्रपूर (दि. 11 जुलै 2023) -
        श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा (Shri Shivaji College of Arts, Commerce and Science Rajur) येथे समाजशास्त्र विभागाद्वारे दि. 11 जुलै 2023 ला सकाळी 11 वाजता किशोरवयीन विद्यार्थ्यांना (Counseling Workshop) समुपदेशन कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले. प्रमुख मार्गदशक म्हणून डॉ. महेश पाचकवडे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वतः आपण आपली किंमत करायला शिका. स्वतःच आरोग्य सांभाळा. तुम्ही स्वतःची किंमत केली नाही, तुम्ही मेले तरी लोकांना काहीही फरक पडत नाही. जगात आपली कवडीची किंमत नाही. स्वतःची किंमत तेंव्हाच होईल जेव्हा आपण आपले आरोग्य सांभाळू, स्वतःला योग्य घडवू, स्वतःसाठी वेळ देऊ, स्वतःला सुसंस्कृत करू. तसेच किशोरवयात होणारे शरीरातील बदल, समस्या व त्यावरील उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, यांनी विध्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून सतत त्यानुसार वागण्याचे प्रयत्न करावे त्यामुळे तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. विठ्ठल शा. आत्राम यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका अंजली वारकड यांनी केले. तर आभार प्रा. एस. बी. अंगलवार सर यांनी केले. या कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha) (Educational)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top