Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: करंजी येथील पूरपरिस्थितीवर उपाययोजना करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंची राज्य सरकारकडे मागणी काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...... वाचा सविस्तर माहिती बघा व्हिडीओ आमचा विदर्भ - दीपक ...

आमदार सुभाष धोटेंची राज्य सरकारकडे मागणी
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...... वाचा सविस्तर माहिती
बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २० जुलै २०२३) -
        राज्यात सथ्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघात (Rajura Constituency) येणाऱ्या करंजी या गावातील दोन तलाव फुटल्यामुळे गावातील नागरिकांचे हाल बेहाल सुरू आहेत, अतोनात नुकसान होत आहे, परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याआधी राज्य सरकारने विशेष लक्ष घालून येथील पूर परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी व नुकसानग्रस्तांना योग्य मदत करण्यासाठी, आवश्यक नियोजन करावे अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील (State Legislative Session) आजच्या कामकाजात केली. यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आस्वस्थ केले की यासंदर्भात योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येईल. (MLA Subhash Dhote's demand to the state government)

        चंद्रपूर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्हात अनेक ठिकाणी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पावसाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील करंजी (Karanji) येथे मुसळधार पावस व अतिवृष्टी झाल्याने दोन मुख्य तलाव फुटले त्यामुळे येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक झालेली आहे सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून राज्य शासनाने थेट लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला तसेच सर्व आवश्यक यंत्रणांना विशेष सूचना देऊन येथील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top