Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास लाच स्वीकारताना अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. २१ जुलै २०२३) -         चंद्रपुर तालुका पंचायत समिती अं...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २१ जुलै २०२३) -
        चंद्रपुर तालुका पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या घरकुल योजनेची तिसरी किस्त जमा करण्यासाठी कंत्राटी अभियंता यांनी 5 हजार रुपयांची मागणी केल्याने त्याला तडजोडी अंती 2 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. तक्रारदार हे चंद्रपूर तालुक्यातील मौजा निंबाळा येथे राहतात वर्ष 2021 ते 22 या आर्थिक वर्षकरिता फिर्यादी यांना घरकुल मंजूर झाले होते, त्यांच्या घराचे बांधकाम सुरू झाले, 2 किस्त जमा झाल्या त्यांनतर पुन्हा 2 किस्त जमा होणे बाकी होते, तिसरी किस्त तब्बल 45 हजार रुपये जमा करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण गृह निर्माण चे कंत्राटी अभियंता 33 वर्षीय स्वप्नील बबन निमगडे यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. फिर्यादी यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला तडजोडीअंती निमगडे यांनी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. सध्या पुढील कारवाई सुरू आहे. (Anti-corruption department strikes)

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, कर्मचारी रमेश दुपारे, अरुण हटवार, नरेश कुमार ननावरे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, राकेश जांभुळकर, मेघा मोहुर्ले व सतीश सिडाम यांनी केली. लाचलुचपत प्रतिबंधक चंद्रपूर विभागाच्या पोलीस उप अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच मंजुषा भोसले यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै महिन्यात 2 कारवाया करण्यात आल्या आहेत हे येथे विशेष. (chandrapur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top