Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक अंतर्गत राजुरा क्षेत्रात हुतात्मा स्मारक उभारावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २० जुलै २०२३) -         मराठवाडा मुक्ती स...

आमदार सुभाष धोटेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २० जुलै २०२३) -
        मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडयातील सर्व जिल्हयांमध्ये स्वातंत्र्य सेनानी व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक बांधण्याचे कार्य शासनामार्फत ठरवले आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. पूर्वाश्रमीच्या हैदराबाद मुक्ती संग्रामात समाविष्ट असलेल्या राजुरा मतदारसंघातील राजुरा तालुका आदीलाबाद जिल्हयात होता नंतर तो नांदेड जिल्हयात समाविष्ट होता. राजुरा तालुक्याचे प्रशासकीय कामकाज औरंगाबाद विभागातील कार्यालयातून सन 1972 पर्यंत चालत होते. राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर करून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थान मधुन मराठवाडा मुक्त करण्यासाठी जि चळवळ उभारली गेली. त्यात राजुरा तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी यांचे सुद्धा फार मोठे योगदान आहे. तरी आपणास विनंती आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व स्वातंत्र्य सेनानी व हुतात्म्यांना अभिवादन म्हणून पूर्वाश्रमीच्या राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांमध्ये हुतात्मा स्मारक बांधकामाचे कार्य हाती घेण्यात यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (MLA Subhash Dhote's demand to Chief Minister Shinde) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top